आम्हाला कोरोनाची नव्हे, हल्ल्यांची भीती, एम्सच्या डॉक्टरांचे गृहमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 05:18 AM2020-04-18T05:18:07+5:302020-04-18T05:18:25+5:30

एम्सच्या डॉक्टरांचे गृहमंत्र्यांना पत्र : आरोग्य सेवकांवरील हल्ले रोखणारे विधेयक अमलात आणा

We are not afraid of attacks, not of Corona, Ames Doctor's letter to the Home Minister | आम्हाला कोरोनाची नव्हे, हल्ल्यांची भीती, एम्सच्या डॉक्टरांचे गृहमंत्र्यांना पत्र

आम्हाला कोरोनाची नव्हे, हल्ल्यांची भीती, एम्सच्या डॉक्टरांचे गृहमंत्र्यांना पत्र

googlenewsNext

नवी दिल्ली : आम्हाला कोरोनाची नव्हे, तर दररोज होणाऱ्या हल्ल्यांची भीती आहे, या शब्दांत कैफियत मांडून दिल्लीतील एम्सच्या निवासी डॉक्टर संघटनेने आारोग्यसेवकांवरील हल्ले रोखणारे विधेयक अमलात आणण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केली आहे. निवासी डॉक्टर संघटनेने अमित शहा यांना लिहीलेल्या पत्रात देशभरातील सात वेगवेगळ््या घटनांचाही उल्लेख केला आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले, दगडफेक, त्यांना दिली जाणारी वाईट वागणूक, अपमान आदी घटना महामारीच्या काळात घडल्या.

मोरादाबाद, लोकनायक हॉस्पीटल, सुरत, सफदरजंग, भरतपूर, हैदराबाद आणि भोपाळ येथील सात घटनांचा आवर्जुन उल्लेख करण्यात आला आहे.
आरोग्यसेवकांवरील हल्ले तसेच वैद्यकीय संस्थांचे नुकसान प्रतिबंधक विधेयक अंमलात आणून संकटातून सोडवावे, अशी विनंती डॉक्टरांनी केली आहे. निवासी डॉक्टर संघटनेने या विधेयकात दुरुस्तीचीही मागणी केली आहे.

डॉक्टर, परिचारिकांसह इतर आरोग्यसेवकांच्या सुरक्षेसाठी विशेष मार्गदर्शकतत्वे गृह मंत्रालयाने जारी केलेले असतानाही देशभरात हिंसक घटना घडत आहे. वैद्यकीय व्यवसायातील कर्मचारी म्हणून आम्हाला कोरोनाच्या संसगार्ला घाबरत नाही, पण आम्हाला हल्ल्यांची आणि सततच्या अपमानास्पद वागणुकीची नक्कीच भिती आहे, असे या पत्रात नमूद
आहे.

देशात अनेक ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांवर झाले हल्ले

रोजी मोरादाबाद येथे डॉक्टरांचा चमू आणि कर्मचाºयांवर हल्ला झाला होता. त्यापूर्वी १४ एप्रिलला लोकनायक रुग्णालयातील महिला डॉक्टरशी रुग्णाने वाईट वर्तणूक केली होती. त्याच दिवशी हैदराबाद येथील एका युवा डॉक्टरवर संशयित रुग्णाच्या कुटुंबियांनी हल्ला केला होता.

रोजी सफदरजंग येथील दोन डॉक्टर भाजी आणायला गेले असताना एका ४२ वर्षांच्या व्यक्तीने त्यांना मारहाण केली होती. त्याच दिवशी रात्रीच्या वेळी रुग्णालयातून परत येणाºया दोन ज्युनियर डॉक्टरला भोपाळ पोलिसांनी दंड्याने मारहाण केली होती.

च्भरतपूरमध्येही सरकारी रुग्णालयातील एका डॉक्टरला पोलिसांनी व उपजिल्हाधिकाºयाने वाईट वागणूक दिली होती, तर सुरतमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाºया डॉक्टरवर शेजाºयांनी बहिष्कार घातला होता.

च्विशेष म्हणजे या सर्व घटना एप्रिल महिन्यातच घडलेल्या असून, त्यांचा विशेष उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.

Web Title: We are not afraid of attacks, not of Corona, Ames Doctor's letter to the Home Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.