जीएसटीत आम्ही खोडा घातलेला नाही - काँग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2016 03:22 AM2016-01-08T03:22:28+5:302016-01-08T03:22:28+5:30

वस्तू व सेवाकर विधेयक (जीएसटी) संमत करण्यासाठी विरोधकांची मनधरणी करण्याचे सरकारने चालवलेले प्रयत्न ‘देखावा’ आहे.

We are not dug in GST - Congress | जीएसटीत आम्ही खोडा घातलेला नाही - काँग्रेस

जीएसटीत आम्ही खोडा घातलेला नाही - काँग्रेस

googlenewsNext

नवी दिल्ली : वस्तू व सेवाकर विधेयक (जीएसटी) संमत करण्यासाठी विरोधकांची मनधरणी करण्याचे सरकारने चालवलेले
प्रयत्न ‘देखावा’ आहे. प्रत्यक्षात सरकारलाच हे विधेयक संमत
करायचे नाही. त्यामुळे सरकारचा या मुद्यावरील अडेलतट्टूपणा कायम
आहे, अशी टीका काँग्रेसने गुरुवारी केली.
काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी विशेष पत्रपरिषदेत बोलताना ही टीका केली. काँग्रेसने या विधेयकात सुचवलेल्या सूचना मान्य झाल्या आहेत का? सरकारकडून सोनियांना काही प्रस्ताव मिळाला आहे का? असे पत्रकारांनी विचारले असताना, कसला प्रस्ताव, असा उलट सवाल त्यांनी केला. सरकारने कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही. त्यांना आमच्या सूचना मान्य असत्या तर राज्यसभेत काँग्रेसची संख्या कमी होईल, तेव्हाच जीएसटी संमत होऊ शकेल, असे जेटली म्हणाले नसते. वेंकय्या आले
आणि सोनियांना भेटले. हा सगळा देखावा होता. काही ठोस घडले असते तर पंतप्रधान आणि अर्थमंत्री आत्तापर्यंत टिष्ट्वटरवर असते, असे सिब्बल म्हणाले.
जीएसटी विधेयक काँग्रेसमुळे रखडले असल्याचे सरकार दर्शवत आहे. प्रत्यक्षात जीएसटी ही
काँग्रेसची देण आणि पंतप्रधान बनण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनीच या विधेयकास विरोध केला होता. या विधेयकात काँग्रेसने कुठलाही खोडा घातलेला नाही.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: We are not dug in GST - Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.