कन्हैय्याचं कुटुंब म्हणत आम्हाला अभिमान
By Admin | Published: March 1, 2016 06:31 PM2016-03-01T18:31:54+5:302016-03-01T18:31:54+5:30
देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेला जवाहलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याच्या कुटुंबियांनी आम्हाला कन्हैय्याचा अभिमान असल्याचं म्हणल आहे
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १ - देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेला जवाहलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याच्या कुटुंबियांनी आम्हाला कन्हैय्याचा अभिमान असल्याचं म्हणल आहे. ज्याप्रकारचे समर्थन कन्हैय्याला विद्यार्थी तसंच सर्व स्तरातून मिळत आहे, ते पाहता आम्हाला आमच्या या बिहारी मुलाचा अभिमान वाटत असल्यांचं कन्हैय्याचे काका राजेंद्र सिंग यांनी म्हणलं आहे.
कन्हैय्याचे काका राजेंद्र सिंग जेएनयूमधील विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मला माहित नव्हत कन्हैय्याने इतक्या लोकांना प्रभावित केलं आहे आणि त्यांना तो आवडतो. तो आत्ता जेलमध्ये असला तरी आम्हाला त्याचा अभिमान आहे. आमच्या गावातील कोणत्याही मुलाने जेएनयूपर्यंत पोहोचणे खुप कठीण गोष्ट आहे ते कन्हैय्याने साध्य केलं आहे. आणि त्यातही त्याला त्याच्या मित्रांकडून आणि जगभरातून समर्थन मिळत असल्यांचं पाहून आनंद होत असल्याचं राजेंद्र सिंग बोलले आहेत.
राजेंद्र सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकादेखील केली आहे. आमचे पुर्वज स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. आमच्या गावातील लोकांनी ब्रिटिशांशी लढा दिला होता, आणि त्याच गावातील कन्हैय्याला आपला आवाज उठवल्याबद्दल दहशतवादी ठरवलं जातं. मोदी स्वताला चायवाला म्हणतात आणि आता जेव्हा शेतक-याच्या मुलाला टार्गेट केलं जात आहे तेव्हा ते शांत का आहेत ? असा सवालही राजेंद्र सिंग यांनी विचारला आहे.