नागरिक म्हणतात आम्ही आव्हाणेकर की जळगावकर...
By admin | Published: March 14, 2016 12:20 AM2016-03-14T00:20:56+5:302016-03-14T00:20:56+5:30
शिक्षक, पोलीस, ग्रामसेवक अशा शासकीय नोकरांची ही वस्ती आहे. ज्यांनी गृहनिर्माण सोसायटी स्थापन केली ते गायब आहेत. पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने लांबवरून पाणी आणावे लागते.
Next
श क्षक, पोलीस, ग्रामसेवक अशा शासकीय नोकरांची ही वस्ती आहे. ज्यांनी गृहनिर्माण सोसायटी स्थापन केली ते गायब आहेत. पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने लांबवरून पाणी आणावे लागते.बबिता सुभाष मोरे, राजाराम नगर........................या भागात पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. रोज दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून पाणी आणणे शक्य नसल्याने बोरींगचे पाणी पिण्यास सुरुवात केली आहे. वस्ती वाढत असल्याने बोरींगचे पाणी देखील पुरत नाही. पाण्याच्या सोयीसाठी आम्ही २५ हजार रुपये जादा मोजले आहे. मात्र आजपर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिलेली नाही.विद्या सुरेश मोहता, राजाराम नगर...................................................आमचे घर हे आव्हाणे ग्रामपंचायत हद्दीत येते. मात्र आमचा सर्व व्यवहार हा जळगाव शहराशी संबधित आहे. त्यामुळे आम्ही आव्हाणेकर आहोत की जळगावकर हा प्रश्न आहे. ग्रामपंचायत असो की महापालिका आम्ही कर भरण्यासाठी तयार आहोत. मात्र आम्हाला पिण्याचे पाणी, वीज, गटारी या मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.कल्पना मधुकर बाविस्कर, राजाराम नगर.............................................पिण्याच्या पाण्याची या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने आम्हाला रेल्वे स्टेशन, शिवाजी नगर भागातून पाणी आणावे लागते. सकाळ व संध्याकाळी पिण्याचे पाणी आणण्याचा रोजचा दिनक्रम आहे. वाघ नगरच्या धर्तीवर राजाराम नगरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था महापालिकेने करून द्यावी.लखिचंद प्रकाश पाटील................................................तीन गृहनिर्माण सोसायटी स्थापन केल्यानंतर पदाधिकारी गायब आहेत. फोन लावावे तर फोन लागत नाही. उतारे सोसायटीच्या नावाने असल्याने वीज मीटर किंवा पिण्याचे पाण्याची मनपा किंवा ग्रामपंचायतीकडे मागणी केली जाते त्यावेळी अडचणी येत असतात.नीलेश सिद्धार्थ इंगळे.