Rafale Deal : संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी - अखिलेश यादव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 03:16 PM2018-09-23T15:16:28+5:302018-09-23T15:23:27+5:30
राफेल डील प्रकरणाचा मुद्दा आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे. याप्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी व्हावी. सत्य काय आहे, ते जेपीसीशिवाय बाहेर येणार नाही, असे अखिलेश यादव म्हणाले.
नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरुन पुन्हा एकदा देशातील राजकारण वातावरण तापलं आहे. फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्या राफेल डील विधानामुळे फ्रान्ससह भारतातही खळबळ माजली आहे. यावरुन विरोधकांनी सत्ताधारी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी सुद्धा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी याप्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
राफेल डील प्रकरणाचा मुद्दा आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे. याप्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी व्हावी. सत्य काय आहे, ते जेपीसीशिवाय बाहेर येणार नाही, असे अखिलेश यादव म्हणाले.
We demand a Joint Parliamentary Committee (JPC) on #Rafaledeal, without a JPC the truth will not come out, the issue has now become global: Akhilesh Yadav pic.twitter.com/ViJbLAhKO1
— ANI UP (@ANINewsUP) September 23, 2018
काल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानींच्या फायद्यासाठी मागच्या दाराने करारात बदल केले. मोदी आणि अंबानी यांच्यात काय डील झाली, हे देशाला कळायला हवे. मोदी आणि अंबानी यांनी देशाच्या संरक्षण दलांवर 1 लाख 30 हजार कोटी रुपयांचा सर्जिकल स्ट्राईक केला आहे, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे.
(Rafale Deal: 'राहुल गांधींनी मोदींविरोधात पाकिस्तानसोबत महाआघाडी केलीय का?')
Akhilesh Yadav, Mulayam Singh Yadav and Ramgopal Yadav at Samajwadi Party's rally at Delhi's Jantar Mantar pic.twitter.com/UmO3zcbr1y
— ANI UP (@ANINewsUP) September 23, 2018