आम्हाला 'तसे' कुठलेही पत्र मिळाले नाही, राष्ट्रपती भवनातील सुत्रांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 12:35 PM2019-04-12T12:35:50+5:302019-04-12T12:35:55+5:30
महोदय, राजकीय नेतेमंडळी सीमेपार झालेल्या करण्यात आलेल्या कारवाईचा राजकीय फायदा उठवत आहेत.
नवी दिल्ली - भारतीय सैन्यदलातील अधिकारी आणि माजी प्रमुखांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय सैन्याचा राजकीय फायद्यासाठी होत असलेला वापर थांबविण्यासाठी कारवाई करण्याचे या पत्रात म्हटले आहे. याबाबतच्या वृत्ताचे राष्ट्रपती भवनमधील अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर खंडन केले आहे. राष्ट्रपती कार्यालयाला तसे कुठलेही पत्र मिळाले नसल्याचे, राष्ट्रपती भवनमधील सुत्रांनी सांगितले आहे.
महोदय, राजकीय नेतेमंडळी सीमेपार झालेल्या करण्यात आलेल्या कारवाईचा राजकीय फायदा उठवत आहेत. तर काही नेतेमंडळी देशातील सेनेला मोदींची सेना म्हणत आहेत. राजकीय नेत्यांचं हे कृत्य धक्कादायक आणि न स्विकारण्याजोग असल्याचं पत्र सैन्यातील माजी अधिकाऱ्यांनी लिहिल्याची बातम्या माध्यमात येत आहेत. सैन्य अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या या पत्रात कुठल्याही पक्षाचा उल्लेख करण्यात आला नाही. मात्र, यातील जे आरोप आहेत, ते अप्रत्यक्षपणे भाजपाने चालवलेल्या प्रचार मोहिमेकडे लक्ष केंद्रीत करत आहेत. मात्र, याबाबत राष्ट्रपती भवनकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मात्र, अधिकृतपणे हे स्पष्टीकरन नसून तेथील सुत्रांची ही माहिती आहे.
लष्करातील माजी अधिकारी आणि प्रमुखांनी राष्ट्रपतींना विनंती करत, लष्कराचा राजकीय वापर करण्यापासून संबंधित पक्षांना रोखण्याचे आपल्या पत्रात म्हटले आहे. राष्ट्रपतींसोबतच निवडणूक आयोगालाही हे पत्र देण्यात आले आहे. विशेष म्हणजे 8 अधिकाऱ्यांसह 156 माजी सैनिकांचा या चिठ्ठीत प्रत्यक्ष सहभाग आह, अशा आशयाचे पत्र सोशल मीडियावरच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रपती भवनला तसे कुठलेही पत्र मिळाले नसल्याची सुत्रांची माहिती आहे. याबाबत अधिकृतपणे राष्ट्रपती भवनकडून अद्याप सांगण्यात आले नाही.
Rashtrapati Bhavan Source denies receiving any letter supposedly written by armed forces veterans to the President which is circulating in the media. pic.twitter.com/rOWedMumsk
— ANI (@ANI) April 12, 2019
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारतीय सैन्याला मोदीजी की सेना असे म्हटले होते. त्यानंतर, ही नाराजी तीव्र स्वरुपात पुढे आली आहे.