वकिलांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा नव्हता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 01:05 AM2018-04-20T01:05:13+5:302018-04-20T01:05:13+5:30
जम्मू बार असोसिएशनचा सुप्रीम कोर्टात दावा
नवी दिल्ली : कथुआ सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणी वकिलांनी केलेल्या निदर्शनांना आम्ही पाठिंबा दिलेला नव्हता, असे जम्मू हायकोर्ट बार असोसिएशनने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.
बार कौन्सिल आॅफ इंडियाने सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने जम्मू उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ही समिती कथुआला भेट देऊन वकिलांनी केलेल्या निषेधानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे. कथुआ बार असोसिएशननेही आम्ही १२ एप्रिल रोजीच आंदोलन मागे घेतले होते, असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाला सांगितले आहे.
उस विषय कोमत उछालो : अमिताभ
कथुआ लैंगिक अत्याचार घटनेबद्दल काही बोलणेदेखील मला त्रासदायक वाटते, अशी प्रतिक्रिया अभिनेते अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी दिली. ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’चे अॅम्बेसेडर असलेल्या अमिताभना कथुआ घटनेबद्दल विचारता, ते म्हणाले, ‘मुझे उस विषयपर चर्चा करने में घीन आती है. उस विषय को उछालो मत.’ त्यावर बोलणेदेखील भयंकर आहे.
शाळा - कॉलेज बंद
कथुआतील घटनेचे पडसाद श्रीनगरमध्ये उमटत असून, विद्यार्थ्यांचे आंदोलन अयशस्वी व्हावे आणि त्यांनी रस्त्यांवर उतरू नये, यासाठी गुरुवारी श्रीनगर, पुलवामा, शोपियान आणि गंडेरबल जिल्ह्यांतील महाविद्यालये व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवल्या गेल्या.