३६ कोटींहून १४२ कोटी झालो आपण; हिंदू, मुस्लिमांसह सर्व धर्माची किती लोकसंख्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 08:52 PM2023-04-19T20:52:42+5:302023-04-19T20:53:42+5:30

यूएनएफपीएच्या ताज्या रिपोर्टनुसार, भारतात २५ टक्के लोकसंख्या ०-१४ वयोगटातील आहे

We have become 142 crores from 36 crores; What is the population of all religions including Hindus, Muslims? | ३६ कोटींहून १४२ कोटी झालो आपण; हिंदू, मुस्लिमांसह सर्व धर्माची किती लोकसंख्या?

३६ कोटींहून १४२ कोटी झालो आपण; हिंदू, मुस्लिमांसह सर्व धर्माची किती लोकसंख्या?

googlenewsNext

नवी दिल्ली - भारत जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश बनला आहे. लोकसंख्येत भारताने चीनलाही मागे टाकले आहे. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या आयोगाने जारी केलेल्या रिपोर्टमधून हा खुलासा झाला आहे. भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटींवर पोहचली आहे. तर चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटींवर आहे. त्याचा अर्थ या दोन्ही देशातील लोकसंख्येत केवळ २९ लाखांचे अंतर आहे. 

UNFPA ने १९५० साली लोकसंख्या गणना सुरू केली होती. भारताची पहिली जनगणना १९५१ मध्ये झाली. त्यावेळी देशाची लोकसंख्या ३६ कोटी इतकी होती. यूनाइटेड नेशन्सने याआधी अंदाज लावला होता की, एप्रिल महिन्यात भारत चीनला मागे टाकत सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश बनेल. देशातील लोकसंख्येत ४० टक्क्याहून अधिक २५ वर्षापेक्षा कमी प्रमाण आहे. सर्वात जास्त लोकसंख्या १०-२४ वयोगटातील आहे. जवळपास ६८ टक्के लोकसंख्या १५-६४ वयोगटातील आहे. काही लोक हे मोठं संकट असल्याचं बोलतायेत तर काहीजणांनी ही संधी असल्याचे म्हटलं आहे. लोकसंख्येबाबत सर्व पैलू जाणून घेऊया. 

युवकांचा देश भारत 
यूएनएफपीएच्या ताज्या रिपोर्टनुसार, भारतात २५ टक्के लोकसंख्या ०-१४ वयोगटातील आहे. १८ टक्के १०-१९ वयोगटातील, २६ टक्के १०-२४ वयोगटातील, जवळपास ६८ टक्के लोकसंख्या १५-६४ वयोगटातील आहे. ६५ च्या वरील लोकसंख्या केवळ ७ टक्के लोक आहे. चीनपेक्षा भारताची कामगिरी चांगली आहे. महिलांचे प्रमाण ८२ आणि तर पुरुषांचे प्रमाण ७६ वर्ष आहे तर भारतात हा आकडा ७४ आणि ७१ आहे. भारतातील लोकसंख्या प्रत्येक राज्यात वेगळी आहे. केरळ, पंजाबमध्ये वृद्धांची लोकसंख्या जास्त आहे. बिहार, उत्तर प्रदेशात युवकांची संख्या अधिक आहे. 

कोणाची किती लोकसंख्या?
सर्व प्रमुख धर्माची लोकसंख्या वाढली आहे. १९५१ पासून हिंदू ३० कोटींहून ९६ कोटी झालेत. मुस्लिम ३.५ कोटींहून १७.२ कोटी, ईसाई ८० लाखांहून २.८ कोटी, भारतात लोकसंख्येबाबत काही ठोस सांगणे कठीण आहे कारण देशात शेवटची जनगणना २०११ मध्ये झालीय. भारतात लोकसंख्येच्या ४० टक्के २५ वर्षाहून कमी वयाच्या लोकांची आहे. अमेरिका आणि चीनसारखे देशात वेगाने लोकसंख्या वृद्धात्वाकडे जात आहे. परंतु भारत तरूण होत चाललाय. 

१६५ कोटींवर पोहोचल्यानंतरच लोकसंख्येत घट सुरू होईल
भारतातील २५ टक्के लोकसंख्या ०-१४ (वर्षे) वयोगटातील आहे, १८ टक्के १० ते १९ वयोगटातील, २६ टक्के १० ते २४ वयोगटातील, ६८ टक्के १५ ते ६४ वयोगटातील आहे आणि लोकसंख्येच्या सात टक्के लोकसंख्या ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे. विविध संस्थांच्या अंदाजानुसार, भारताची लोकसंख्या सुमारे तीन दशकांपर्यंत वाढत राहण्याची अपेक्षा आहे. १६५ कोटींवर पोहोचल्यानंतरच लोकसंख्येत घट होण्यास सुरुवात होईल. 

Web Title: We have become 142 crores from 36 crores; What is the population of all religions including Hindus, Muslims?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.