आम्ही एकाच सायकलची दोन चाके - अखिलेश
By admin | Published: January 29, 2017 02:52 PM2017-01-29T14:52:01+5:302017-01-29T15:49:49+5:30
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाल्यानंतर आज प्रथमच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव
Next
ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 29 - उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाल्यानंतर आज प्रथमच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. यावेळी एकमेकांवर स्तुतिसुमने उधळताना परस्परांची मुक्तकंठाने प्रशंसा केली एका बाजूला राहुल गांधी यांनी अखिलेश यांच्याशी असलेल्या व्यक्तिगत संबंधांचा हवाला दिला. तर दुसरीकडे अखिलेश यांनी आपण आणि राहुल एकाच सायकलची दोन चाके असल्याचे सांगितले.
या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान, दोन्ही पक्षांचे प्रचार गीत "यूपी को यह साथ पसंद है' प्रसिद्घ करण्यात आले. यावेळी काँग्रेस आणि सपाची आघाडी म्हणजे गंगा आणि यमुनेचा संगम असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. तसेच द्वेशाच्या राजकारणाला प्रत्युत्तर देण्यासाठी ही आघाडी केल्याचे ते म्हणाले. या परिषदेत दोघांचाही रोख मायावती यांच्यापेक्षा मोदींवरच अधिक असल्याचे दिसून आले.
Ganga-Yamuna ek soch hai, ye jahan milti hain unko pehchana nahi jaata ki ye Ganga hai aur ye Yamuna, aisa alliance hoga: Rahul Gandhi pic.twitter.com/QyCjs7DrIy
— ANI UP (@ANINewsUP) 29 January 2017
राहुल म्हणाले, "द्वेशाच्या राजकारणामुळे देशाचे नुकसान झाले आहे. पण उत्तर प्रदेशच्या डीएनएमध्ये प्रेम आणि बंधुभाव आहे. द्वेश नाही. आता उत्तर प्रदेशच्या तरुणांना आम्ही नवा रस्ता दाखवू इच्छितोय. नव्या प्रकारचे राजकारण देऊ इच्छित आहोत. आम्ही वैचारिक समानतेच्या मुद्यावर एकत्र येऊन निवडणूक लढवत आहोत."
तर अखिलेश यांनीही राहुल यांची प्रशंसा केली. "राहुल आणि मी एकाच सायकलची दोन चाके आहोत. हात आणि सायकल एकत्र असतील तर वेग वाढणारच, आता उत्तर प्रदेश देशाला रस्ता दाखवतो आणि आम्ही या राज्याला वेगाने पुढे घेऊन जाऊ," असे अखिलेश यांनी सांगितले.
— ANI UP (@ANINewsUP) 29 January 2017