जेएनयूसोबतची वैचारिक लढाई आपण जिंकलो आहोत - अरुण जेटली

By admin | Published: March 7, 2016 08:31 AM2016-03-07T08:31:14+5:302016-03-07T08:31:14+5:30

जवाहलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) प्रकरणी आपण वैचारिक लढाई जिंकलो आहोत असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली बोलले आहेत

We have won the ideological battle with JNU - Arun Jaitley | जेएनयूसोबतची वैचारिक लढाई आपण जिंकलो आहोत - अरुण जेटली

जेएनयूसोबतची वैचारिक लढाई आपण जिंकलो आहोत - अरुण जेटली

Next
>ऑनलाइन लोकमत - 
उत्तरप्रदेश, दि. ७ - जवाहलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) प्रकरणी आपण वैचारिक लढाई जिंकलो आहोत असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली बोलले आहेत. जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी देशद्रोहाच्या आरोपाखाली विद्यार्थ्यांना अटक करण्यात आले होते त्यांच्याविरोधातील वैचारिक लढाई जिंकलो असल्याचं अरुण जेटली बोलले आहेत. 
 
आपण जिंकलो आहत, ज्यांनी देशविरोधी घोषणा देत देशाचे तुकडे करण्याच्या घोषणा दिल्या होत्या ते आज जय हिंदच्या घोषणा देत आहेत. कारागृहातून सुटका झाल्यावर भारताचा झेंडा फडकवत आहेत. जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याने जेलमधून सुटका झाल्यावर दिलेलं भाषण हा आपला विजय आहे असं अरुण जेटलींनी म्हणलं आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे. 
 
यावेळी बोलताना अरुण जेटली यांनी काँग्रेसवरदेखील टीका केली. जेएनयूला काँग्रेसने केलेलं समर्थन ही वैचारिक पोकळी आहे. काही लोकांना याकुबच्या तर काहींना अफजल गुरुच्या समर्थनार्थ कार्यक्रम करायचे आहे. काँग्रेसचा नेता त्यांचं समर्थन करतो हे देशाचं दुर्देव असल्याचं म्हणत अरुण जेटलींनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधींवर टीका केली आहे.डावे  पक्ष लोकशाही विरोधी असल्याची टीकाही अरुण जेटली यांनी केली आहे. 
 

Web Title: We have won the ideological battle with JNU - Arun Jaitley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.