अफगाणिस्तानातील परिस्थितीवर पवारांची सूचक प्रतिक्रिया, सरकारला दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 04:35 PM2021-08-16T16:35:58+5:302021-08-16T16:44:23+5:30

भारताला आजपर्यंत पाकिस्तान आणि चीनकडून सातत्याने अडचणी आल्या आहेत. आता, अफगाणिस्तानचीही त्यात भर पडली आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि चीन हे भारताच्या सीमारेषेवरील देश आहेत.

We need to be more vigilant, sharad Pawar advises after Taliban rule | अफगाणिस्तानातील परिस्थितीवर पवारांची सूचक प्रतिक्रिया, सरकारला दिला मोलाचा सल्ला

अफगाणिस्तानातील परिस्थितीवर पवारांची सूचक प्रतिक्रिया, सरकारला दिला मोलाचा सल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देभारताचे चीन व पाकिस्तान या दोन्ही देशांना सोडून इतर शेजारील देशांसोबत संबंध चांगले आहेत. सध्या, नेपाळ, श्रीलंका आणि बांग्लादेशमधील परिस्थिती बदलली आहे.

मुंबई - अफगाणिस्तानची राजधानी काबुलसह बहुतांश भागावर रविवारी तालिबाननं कब्जा केला. अशाच परस्थितीत अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडून पलायन केले आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानमधील नागरिक तालिबानच्या भीतीनं अन्य देशांमध्ये शरण घेण्यास जात आहे. त्यापैकी, काही अफगानी नागरिक भारतातही आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी येथील घडामोडींवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, केंद्र सरकारला मोलाचा सल्लाही दिलाय.   

भारताला आजपर्यंत पाकिस्तान आणि चीनकडून सातत्याने अडचणी आल्या आहेत. आता, अफगाणिस्तानचीही त्यात भर पडली आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि चीन हे भारताच्या सीमारेषेवरील देश आहेत. त्यामुळे, आता आपल्याला अधिक सतर्क राहावे लागणार आहे. हुकूमशाहीने आलेल्या तालिबानींनी शांती राहावी, आम्हाला शांतता प्रस्थापित करायची आहे. लोकांना विश्वास द्यायचा असल्याचे म्हटले आहे. मात्र, आशा धरुयात की यात काही सत्यता असेल, असेही पवार यांनी म्हटले. 

भारताचे चीन व पाकिस्तान या दोन्ही देशांना सोडून इतर शेजारील देशांसोबत संबंध चांगले आहेत. सध्या, नेपाळ, श्रीलंका आणि बांग्लादेशमधील परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे, आपल्या विदेशनितीचा आढावा घेण्याची वेळ आल्याचं पवार यांनी म्हटलं. तसेच, हा संवेदनशील विषय असल्यानं यावर मी अधिक बोलणार नाही. मात्र, देशाच्या सुरक्षेचा मुद्दा असल्याने सरकारला यात सर्वोतोपरी सहकार्य करण्याची आमची भूमिका असेल, असेही पवार यांनी म्हटले.  

अमेरिकेनंतर अफगानिस्तानच्या (Afghanistan) राष्ट्राध्यक्षांनी राजीनामा देऊन पलायन केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेने अब्जावधी रुपये खर्च करून गेली २० वर्षे तालिबानला (Taliban) सत्तेपासून लांब ठेवले होते. तालिबानने बलाढ्य अशा अमेरिकेलाही हरविले आहे आणि पुन्हा तालिबानी सत्ता स्थापन करण्याच्या टप्प्यात आहे. तालिबानचा नेता मुल्ला अब्दुल गनी बरादर (mullah abdul ghani baradar) हा अफगानचा पुढील राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता आहे. मात्र, तालिबानला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत. 

भारत पाकिस्तान वादात हस्तक्षेप नाही - तालिबान

तालिबानकडून भारतासोबतच्या संबंधावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. तालिबानचे प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद यांनी भारतासोबत चांगले आणि मजबूत संबंध हवेत, असे म्हटलं आहे. तसेच, अफगाणिस्तानात भारतातील उच्चायुक्तालयाचे अधिकारी सुरक्षित असून कुणालाही देश सोडून जाण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादात तालिबानचा कुठलाही हस्तक्षेप असणार नाही. दोन्ही देशांमधील समस्या ही त्यांची स्वत:ची आहे. त्यामुळे, यात हस्तक्षेप असणार नाही, असेही तालिबानकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात आज तकने वृत्त दिले आहे. 

गनी यांची भावूक पोस्ट

"माझ्यासमोर आव्हानात्मक पर्याय होते. मला कठोर निर्णय घ्यावा लागला आणि म्हणून मी देश सोडला आहे. तालिबानसमोर मला उभे ठाकायला हवे. देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी गेली २० वर्षे झटलो. देश सोडला नसता, तर देशवासीयांना घातक परिणामांना सामोरे जावे लागले असते. तालिबानने मला हटवले आहे. काबुलमधील सामान्य जनतेवर हल्ले करण्यासाठी ते आले आहेत. लोकांना जास्त रक्तपात पाहावा लागू नये म्हणून आपण अफगाणिस्तानातून पळून गेलो, असं गनी यांनी म्हटलं आहे. 

काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असतं

"मी अफगाणिस्तानमध्ये राहिलो असते तर मोठ्या संख्येने लोक देशासाठी लढायला आले असते. अशा स्थितीत असंख्य लोक तिथे मरण पावले असते. तसेच काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असतं. आता तालिबान जिंकला आहे. आता तो अफगाण लोकांच्या सन्मान, मालमत्ता आणि सुरक्षेसाठी जबाबदार आहे. तालिबान एका ऐतिहासिक परीक्षेला सामोरे जात आहे. आता एकतर तो अफगाणिस्तानचे नाव आणि सन्मान वाचवेल, असं घनी यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
 

Read in English

Web Title: We need to be more vigilant, sharad Pawar advises after Taliban rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.