अर्थसंकल्पातून प्रत्येकाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला
By admin | Published: February 1, 2017 05:12 PM2017-02-01T17:12:13+5:302017-02-01T17:12:13+5:30
आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामधून शेतकरी, गरीब, ग्रामीण भाग, करदाते, कंपन्या अशा सर्वांसाठीच काही ना
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामधून शेतकरी, गरीब, ग्रामीण भाग, करदाते, कंपन्या अशा सर्वांसाठीच काही ना काही तरतुदी करण्यात आल्या. दरम्यान, अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दूरदर्शनच्या डीडी न्यूज या वृत्तवाहिनील दिलेल्या मुलाखतीत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पातून आपण सर्व वर्गांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.
नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर सर्वांनाच या अर्थसंकल्पातून दिलासादायक घोषणांची अपेक्षा होती. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पात प्रत्येक वर्गातील करदात्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे जेटलींनी सांगितले. तसेच प्रामाणिक करदाते आणि मध्यमवर्गाच्या हातात अधिकाधिक पैसे यावेत हा सरकारचा उद्देश आहे, त्याबरोबरच अधिकाधिक व्यक्ती कराच्या चौकटीत आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
करात सूट दिल्याने सरकारचे आर्थिक नुकसान होईल, पण करचोरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळून त्याची भरपाई करण्यात येणार असल्याचे जेटलींनी सांगितले.