...तर ट्रम्प यांच्याबरोबरची बैठक आम्ही रद्द करू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 05:12 AM2018-05-17T05:12:02+5:302018-05-17T07:19:15+5:30

उत्तर कोरिया अण्वस्त्रांचा त्याग करत नाही तोवर त्या देशावरील निर्बंध मागे घेता येणार नाही, असा इशारा अमेरिकेने दिल्याने संतप्त झालेल्या उ. कोरियाने राष्ट्रप्रमुख किम जाँग उन व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात १२ जून होणारी बैठक रद्द करण्याचा इशारा दिला.

... we will cancel the meeting with Trump! | ...तर ट्रम्प यांच्याबरोबरची बैठक आम्ही रद्द करू!

...तर ट्रम्प यांच्याबरोबरची बैठक आम्ही रद्द करू!

Next

सेऊल : उत्तर कोरिया अण्वस्त्रांचा त्याग करत नाही तोवर त्या देशावरील निर्बंध मागे घेता येणार नाही, असा इशारा अमेरिकेने दिल्याने संतप्त झालेल्या उ. कोरियाने राष्ट्रप्रमुख किम जाँग उन व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात १२ जून होणारी बैठक रद्द करण्याचा इशारा दिला.
उत्तर कोरियाने म्हटले आहे की, अमेरिका आम्हाला निर्बंधांची भीतीही दाखविली जात आहे. अण्वस्त्रे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून त्यांची निर्मिती करण्यात अनेक वर्षे खर्ची पडली आहेत. अण्वस्त्रांचा त्याग करण्याचा आग्रह ट्रम्प यांनी धरू नये. त्यांनी पूर्वसुरींसारखे वागू नये. याआधी उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाशी होणारी चर्चा रद्द केली. अमेरिकेने मात्र किम यांच्याबरोबर ठरल्याप्रमाणेच बैठक होणार असून त्यासाठी आमची पूर्वतयारी सुरू आहे असे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: ... we will cancel the meeting with Trump!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.