...तर देशात 5 कोटी नोकऱ्या तयार होतील आणि हेच आमचं लक्ष्य; गडकरींनी सांगितला सरकारचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 09:16 PM2020-08-18T21:16:52+5:302020-08-18T21:22:00+5:30

फेसबुक वादावर बोलताना गडकरी म्हणाले, राहुल गांधी हे देशाचे एक जबाबदार नेते आहेत. त्यांनी कोणत्याही रिपोर्टच्या हवाल्याने कुठलेही भाष्य करणे योग्य नाही. त्यांनी स्वतःच रिसर्च करायला हवा आणि यानंतरच त्यांनी सर्वांसमोर भाष्य करायला हवे.

we will create 5 crore jobs shortly said Nitin Gadkari in news18 india chaupal Program | ...तर देशात 5 कोटी नोकऱ्या तयार होतील आणि हेच आमचं लक्ष्य; गडकरींनी सांगितला सरकारचा प्लॅन

...तर देशात 5 कोटी नोकऱ्या तयार होतील आणि हेच आमचं लक्ष्य; गडकरींनी सांगितला सरकारचा प्लॅन

googlenewsNext
ठळक मुद्देआपली निर्यात वाढेल आणि देशात कॅपिटल इन्व्हेस्टमेंटदेखील वाढेल.राहुल गांधी हे देशाचे एक जबाबदार नेते आहेत. त्यांनी कोणत्याही रिपोर्टच्या हवाल्याने कुठलेही भाष्य करणे योग्य नाही.आपण लवकरच कोरोना संकटातून बाहेर पडू आणि आपल्याला कोरोनाची लस मिळेल

नवी दिल्ली - ज्या पद्धतीने आपण कोरोनाची लढाई लढत आहोत. त्याच पद्धतीने आपण आर्थिक लढाईदेखील लढत आहोत. यामुळेच सरकारने आर्थिक पॅकेज जारी केले आहे. आपण लवकरच कोरोना संकटातून बाहेर पडू. आपली निर्यात वाढेल आणि देशात कॅपिटल इन्व्हेस्टमेंटदेखील वाढेल. सरकार निर्यात वाढविण्यावर काम करत आहे. यामुळे देशात 5 कोटी नोकऱ्या तयार होतील. हेच आमचे लक्ष्य आहे, असे केंद्रीय रस्ते आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले आहे. ते News18 च्या 'चौपाल' या कार्यक्रमात बोलत होते. 

रिपोर्टच्या हवाल्याने नाही, रिसर्च करून बोलायला हवे - 
फेसबुक वादावर बोलताना गडकरी म्हणाले, राहुल गांधी हे देशाचे एक जबाबदार नेते आहेत. त्यांनी कोणत्याही रिपोर्टच्या हवाल्याने कुठलेही भाष्य करणे योग्य नाही. त्यांनी स्वतःच रिसर्च करायला हवा आणि यानंतरच त्यांनी सर्वांसमोर भाष्य करायला हवे.

तपास पूर्ण होईपर्यंत सुशांत प्रकरणावर काहीही बोलणार नाही -
नितिन गडकरी म्हणाले, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांनी आपला तपास केला आहे. सीबीआयचाही तपास सुरू आहे. तपास पूर्ण होईपर्यंत आपण यावर काहीही बोलणे योग्य नाही. रिपोर्ट आल्याशिवाय आपण यावर कुठलेही भाष्य करणे योग्य नाही.

कोरोना वैश्विक संकट आहे, याने प्रत्येकाचेच नुकसान -
कोरोना संकटावर बोलताना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी म्हणाले, कोरोना लढाईच्या काळात आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. उद्योग क्षेत्र, परिवहन आदींचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, हे वैश्विक संकट आहे. आपण लवकरच यातून बाहेर पडू आणि आपल्याला कोरोनाची लस मिळेल, असेही गडकरी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या -

खूशखबर! देशात तयार होताहेत 3 कोरोना लशी; एकीचं तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण आज-उद्या सुरू होणार

कोरोनाविरोधातील लढाईत आणखी एक पाऊल, याच आठवड्यात तिसऱ्या टप्प्यात पोहोचणार ऑक्सफर्डची लस 

15 ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी लडाखवरून सुनावलं; आता अशी आली चीनची प्रतिक्रिया

CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!

CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

Web Title: we will create 5 crore jobs shortly said Nitin Gadkari in news18 india chaupal Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.