सैनिकांसाठी आम्ही पाकिस्तानला पराभूत करु - पीआर श्रीजेश
By admin | Published: September 28, 2016 04:49 PM2016-09-28T16:49:03+5:302016-09-28T16:57:43+5:30
आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये पूर्ण क्षमतेने खेळ करुन पाकिस्तानला पराभूत करु असे भारतीय हॉकी संघाचा कर्णधार पीआर श्रीजेशने बुधवारी सांगितले.
Next
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. २८ - आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये पूर्ण क्षमतेने खेळ करुन पाकिस्तानला पराभूत करु असे भारतीय हॉकी संघाचा कर्णधार पीआर श्रीजेशने बुधवारी सांगितले. श्रीजेशच्या या वक्तव्याला उरी दहशतवादी हल्ल्याची किनार आहे. त्याने उरी हल्ल्याचा कुठेही उल्लेख केला नाही. पण पाकिस्तानकडून पराभव स्वीकारुन आम्ही आमच्या सैन्याला निराश करणार नाही असे श्रीजेशने सांगितले.
पुढच्या महिन्यात मलेशियामध्ये होणा-या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारताचा पाकिस्तान विरुद्ध सामना होणार आहे. २० ते ३० ऑक्टोंबर दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. भारत-पाकिस्तानचा सामना क्रिकेटच्या मैदानावर असो किंवा हॉकीच्या. दोन्ही बाजूला उत्सुक्ता तितकीच असते. कारण कोणालाही पराभव मान्य नसतो.
आम्ही पूर्ण १०० टक्के योगदान देऊ. सीमेवर आपल्या जवानांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे आम्हाला सैन्याला निराश करायचे नाही असे श्रीजेशने सांगितले. आशियातील सहा दिग्गज संघ या स्पर्धेत खेळणार असून, २३ ऑक्टोंबरला भारताचा पाकिस्तान विरुद्ध सामना होणार आहे.