'65 हून अधिक जागांचा टप्पा गाठू', निवडणूक जाहीर होताच भाजपाचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 08:16 PM2019-11-01T20:16:18+5:302019-11-20T12:07:59+5:30

सध्या राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आहे.

We will definitely cross the target of 65+,” Om Mathur, in-charge of Jharkhand BJP | '65 हून अधिक जागांचा टप्पा गाठू', निवडणूक जाहीर होताच भाजपाचा दावा 

'65 हून अधिक जागांचा टप्पा गाठू', निवडणूक जाहीर होताच भाजपाचा दावा 

Next

नवी दिल्ली : झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी तारीख जाहीर होताच भाजपाने राज्यात 65 हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला आहे. झारखंडमधील भाजपाचे प्रभारी ओम माथुर यांनी सांगितले की, "गेल्या वर्षभरापासून राज्यात निवडणुकीसाठी एकत्र तयारी करत सुरु आहे. मी स्वत: बुथ स्तरावरील सर्व उपक्रम आणि तयारींचे विश्लेषण केले आहे. त्यामुळे आम्ही निश्चितच 65 हून अधिक जागांचा टप्पा गाठू." 

महाराष्ट्र आणि हरयाणामधील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता झारखंड विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली.  झारखंड विधानसभा निवडणूक पाच टप्प्यात मतदान होणार आहे. पहिला टप्प्यात  ३० नोव्हेंबरला, दुसऱ्या टप्प्यात ७ डिसेंबरला, तिसऱ्या टप्प्यात १२ डिसेंबरला, चौथ्या टप्प्यात १६ डिसेंबरला आणि पाचव्या टप्प्यात २० डिसेंबरला होणार असून २३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 

झारखंडमध्ये विधानसभेच्या 81 जागा आहेत. सध्या राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आहे. राज्यात काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा हे प्रमुख विरोधी पक्ष आहेत. त्याशिवाय संयुक्त जनता दल, जेव्हएम, बीएसपी, एजेएसयू हे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.

झारखंड विधानसभेतील सध्याचे पक्षीय बलाबल
भाजपा - 49 
एजेएसयू - 3 
झारखंड मुक्ती मोर्चा - 17
काँग्रेस - 5
जेव्हीएम (पी) -1
सीपीआय (एमएल) -1 
बीएसपी - 1
एमससी -1 
 

Web Title: We will definitely cross the target of 65+,” Om Mathur, in-charge of Jharkhand BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.