दुसऱ्याच्या इच्छेने नाही, जेथे धोका दिसेल तेथे युद्ध करू; NSA अजित डोवालांचा इशारा
By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 26, 2020 10:07 AM2020-10-26T10:07:23+5:302020-10-26T10:09:42+5:30
डोवाल म्हणाले, आपल्याला जेथे वाटते, तेथे आम्ही लढावे हे आवश्यक नाही. जेथून आम्हाला धोका दिसेल, तेथे आम्ही लढू. आम्ही युद्ध तर करणार, आमच्या भूभागावरही आणि बाहेरील भूभागावरही.
नवी दिल्ली - पूर्व लडाखमध्ये (East Ladakh) गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीन यांच्यात तणावाचे वातावरण आहे. यातच राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांनी रविवारी चीनपासून पाकिस्तानपर्यंत सर्वांनाच इशारा दिला आहे. शत्रू राष्ट्रांना इशारा देताना डोवाल म्हणाले, इतिहास साक्षी आहे, की भारताने कधीही कुण्याही देशावर हल्ला केलेला नाही. मात्र, जेथे धोका दिसेल, तेथे प्रहार केला जाईल, हे निश्चित. विजयादशमी निमित्त उत्तराखंडमधील ऋषिकेश येथी परमार्थ निकेतनमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
डोवाल म्हणाले, आपल्याला जेथे वाटते, तेथे आम्ही लढावे हे आवश्यक नाही. जेथून आम्हाला धोका दिसेल, तेथे आम्ही लढू. आम्ही युद्ध तर करणार, आमच्या भूभागावरही आणि बाहेरील भूभागावरही. मात्र, ते आम्ही आपल्या वैयक्तीक स्वार्थासाठी नाही, तर परमार्थासाठी करू.
भारत एक सभ्य देश आहे. ज्याचे अस्तित्व अनादी काळापासून आहे. भारत आपली समृद्ध संस्कृती आणि सभ्यतेमुळेच कुठलाही धर्म अथवा भाषेच्या परिघात बांधला गेला नाही. एवढेच नाही, तर याच भूमीवरून वसुधैव कुटुंबकम आणि प्रत्येक मानसात इश्वराचा अंश आहे, या तत्वज्ञानाचा प्रचार झाला. एक देश म्हणून भारताला मजबूत ओळख देण्यात आणि संस्कारक्षम बनविण्यात येथील संत मंडळींचे मोठे योगदान आहे. येथील संतांनी राष्ट्र निर्माणाच्या कार्यात मोठे योगदान दिले आहे, असेही डोवाल म्हणाले.
...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप
NSA Ajit Doval's speech not about China or any specific situation, govt officials clarify
— ANI Digital (@ani_digital) October 25, 2020
Read @ANI Story | https://t.co/Gn9IKFfQOnpic.twitter.com/83wSX3IuAZ
डोवालांच्या भाषणावर सरकारचे स्पष्टिकरण -
एनएसए डोवाल यांच्या वक्तव्यावर सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे, एनएसए डोवाल यांचे वक्तव्य चीनसंदर्बात नसून, ते भारताच्या आध्यात्मिक विचारांसंदर्भात आहे. मात्र, भारत कुठल्याही देशाला घाबरणार नाही. तसेच युद्धाच्या कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहे, असे डोवाल यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते.