आम्ही फाशी जाऊ, पण तुमचा अहंकार मोडून टाकू - लालूंचा केंद्र सरकारवर निशाणा

By admin | Published: July 7, 2017 08:29 PM2017-07-07T20:29:45+5:302017-07-07T20:53:02+5:30

आम्ही फाशी जाऊ, पण तुमचा अहंकार मोडून टाकू अशी घणाघाती टीका लालू यांनी केंद्र सरकारवर केली

We will go to the gallows, but we will break your ego - Lalu's movement on the central government | आम्ही फाशी जाऊ, पण तुमचा अहंकार मोडून टाकू - लालूंचा केंद्र सरकारवर निशाणा

आम्ही फाशी जाऊ, पण तुमचा अहंकार मोडून टाकू - लालूंचा केंद्र सरकारवर निशाणा

Next

ऑनलाइन लोकमत
पटना, दि. 7 - केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागा(सीबीआय)नं राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यावर बेनामी अ‍ॅक्टअंतर्गत कारवाई केली आहे. या कारवाईनंतर लालूप्रसाद यादव यांनी भाजपा आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे. आज सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, बेनामी अ‍ॅक्टअंतर्गत झालेल्या कारवाईत सीबीआयचा दोष नाही, मोदी आणि अमित शहा यांचा दोष आहे. आम्ही फाशी जाऊ, पण तुमचा अहंकार मोडून टाकू असे ते म्हणाले.
मोदी सरकार सर्व विरोधी पक्षनेत्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप यावेळी लालूंनी केला. यावेळी पत्रकार परिषदेत गोंधळ झाला. राबडी देवींची 10 तास तर तेजस्वीची 8 तास सीबीआयने चौकशी केल्याचं वृत्त खोटं असल्याचा खुलासा यावेळी लालूंनी केला. लालूंचे पुत्र तेजस्वी यादवने यावेळी आरएसएसवर निशाना साधला, ते म्हणाले, संघांच्या एजंटांना बिहारमध्ये प्रवेश नाही.
बेनामी संपत्तीवर लालू म्हणाले, मी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार केला नाही. 31 मे 2004 रोजी मी रेल्वे मंत्री बनलो, तर हॉटेलची 2003 मध्ये लीजवर देण्यात आली होती. 2006च्या रेल्वे कॅटरिंगच्या टेंडर प्रकरणात सीबीआयनं लालूप्रसाद यादवांसमवेत राबडी देवी, तेजस्वी यादव, सरला गुप्ता, आयआरसीटीसीचे तत्कालीन एमडी पी. के. गोयल, विजय कोचर, विनय कोचर यांच्यावर कलम 420 आणि 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लालू यांनी रेल्वेमंत्रिपदाच्या कार्यकाळात 32 कोटींची जमीन जवळपास 65 लाख रुपयांना विकली होती. तसेच या व्यवहाराच्या माध्यमातून त्यांनी स्वतःच्या खासगी कंपन्यांना फायदा पोहोचवला होता. राबडीदेवी सरकारी नोकर नसताना त्यांच्यावर केस का दाखल केली? असा प्रश्न यावेळी लालूंनी उपस्थित केला.

आणखी वाचा

सीबीआयने लालू आणि अन्य आरोपींशी संबंधित असणा-या 12 ठिकाणांवर छापेमारीची कारवाई केली. लालू रेल्वेमंत्री असताना त्यांनी आपल्या अधिकाराचा उपयोग करून भारतीय रेल्वे कॅटरींग अँड टुरिजम कॉर्पोरेशन म्हणजे आयआरसीटीसीच्या माध्यमातून खासगी हॉटेल कंपन्यांना बेकायदा लाभ पोहोचवल्याचा आरोप आहे. लालू काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात 2004 ते 2009 दरम्यान देशाचे रेल्वेमंत्री होते. लालू प्रसाद यादव यांनी हॉटेल भाडेपट्टयावर देण्याच्या मोबदल्यात जमीन घेतली, असा आरोप सीबीआयने केला आहे. दरम्यान सीबीआयने एफआयआर नोंदवल्यानंतर लालू प्रसाद यादव यांच्या पाटणा 10 सर्क्युलर रोड निवासस्थानी बंदोबस्तात वाढवण्यात आला आहे.

Web Title: We will go to the gallows, but we will break your ego - Lalu's movement on the central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.