‘गोरक्षकांना धडा शिकवण्यासाठी हाती शस्त्रे घेऊ’

By admin | Published: July 2, 2017 12:58 AM2017-07-02T00:58:21+5:302017-07-02T00:58:21+5:30

स्वयंघोषित गोरक्षकांकडून गुरुवारी मुस्लीम व्यापाऱ्याची मारहाणीत हत्या केल्यानंतर येथील मुस्लीम महिलांनी गोरक्षकांना हाती

'We will have weapons to teach the lesson to the Gurkhas' | ‘गोरक्षकांना धडा शिकवण्यासाठी हाती शस्त्रे घेऊ’

‘गोरक्षकांना धडा शिकवण्यासाठी हाती शस्त्रे घेऊ’

Next

मनुवा (रामगढ-झारखंड) : स्वयंघोषित गोरक्षकांकडून गुरुवारी मुस्लीम व्यापाऱ्याची मारहाणीत हत्या केल्यानंतर येथील मुस्लीम महिलांनी गोरक्षकांना हाती शस्त्रे घेऊन धडा शिकवण्याची धमकी दिली आहे.
मुस्लीम व्यापारी अलिमुद्दीन उर्फ असगर अली यांचा जवळपास १०० जणांच्या जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. अलिमुद्दीन गायीच्या मांसाची वाहतूक करीत असल्याचा या जमावाचा संशय होता. जमावाने त्यांची कारही पेटवून दिली. पोलिसांच्या वर्तनाने संतापलेल्या महिलांचा आता पोलिसांवरही विश्वास राहिलेला नाही. सरकारच या गोरक्षकांच्या कृत्यांत सहभागी असल्याची त्यांची भावना आहे. जमावाच्या कृत्याला जमावाद्वारेच उत्तर दिले जाईल, असे अलिमुद्दीन यांची पत्नी मरीयम खातून म्हणाल्या. गोरक्षकांना उत्तर देण्याबद्दल अनेक महिला मरीयम यांच्याशी सहमत आहेत. तर ममिना खातून म्हणाल्या की, आम्ही बायका आमचे पती घरी परत येतील की नाही या विचारांनी सतत भयभीत असतो. सरकार जर काही कृती करणार नसेल तर आम्ही आमच्या माणसांच्या संरक्षणासाठी हाती शस्त्रे घेऊ.  

अधिकाऱ्यांच्या विरोधात येथे स्पष्ट संताप दिसत होता. आमच्या खाण्यापिण्याच्या सवयी काय आहेत, यात ठरावीक समाजाला काय गोडी आहे? आम्ही त्यांच्या स्वयंपाकघरात डोकावतो का? असे अबिदा खातून म्हणाल्या. आम्ही शांततेने जगणारे लोक आहोत. एखादी घटना आम्हाला शस्त्र हाती घेण्यास चिथावणी देणार नाही, असे भोला खान म्हणाले. प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये खान यांनी मध्यस्थ म्हणून काम केले.

Web Title: 'We will have weapons to teach the lesson to the Gurkhas'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.