आम्ही येथून जाणार नाही
By admin | Published: January 30, 2015 09:11 PM2015-01-30T21:11:45+5:302015-01-30T21:11:45+5:30
गंगाजमुनातील वारांगनांचा इशारा : पोलीस कारवाईच्या धाडसत्राने वारांगना दहशतीत
Next
न लंगा : शहरातील प्राध्यापक वसाहत विद्यानगरात बिअरबार सुरु करण्यास नगरपालिकेने नाहरकत प्रमाणपत्र द्यावे, असा काही नगरसेवकांनी ठराव मांडला होता़ हा ठराव मंजूरही झाल्याने शंभर महिलांनी त्यास विरोध दर्शवित जिल्हाधिकार्यांकडे धाव घेतली़ महिलांचा हा पावित्रा पाहून ठराव मांडणार्या नगरसेवकांनी कोलांटउडी घेत आम्ही हा ठरावच मांडला नाही, असे दर्शविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे़ त्यामुळे शहरात या नगरसेवकांची जोरदार चर्चा सुरु आहे़शहरातील बसस्थानकाशेजारी प्राध्यापक वसाहत, विद्यानगर आहे़ या नगरात बिअरबार सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी एका महिलेने केली होती़ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काही नगरसेवकांनी हा ठराव मांडला़ तेव्हा नगरसेविका वसुंधरा शिंगाडे यांनी त्यावर हरकत घेत परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी केली़ परंतु, नगरपालिकेने या हरकतीस केराची टोपली दाखवत १६ ऑक्टोबर २०१४ रोजी परवानगी दिली़आपल्या वस्तीत बिअरबार होणार असल्याची माहिती नागरिकांनी मिळाल्याने विद्यानगरातील १०० महिलांनी बुधवारी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतली आणि नगरपालिकेने दिलेले नाहरकत प्रमाणपत्र रद्द करावे, अशी मागणी केली आहे़ या निवेदनावर विना चोपणे, सुवर्णा सोळुंके, जनाबाई शिंदे, विजया वाडीकर, प्रणिता जाधव, प्रियंका जाधव, शोभा नितनवरे, प्रियंका धूत, शालिनी कुलकर्णी, कमल तुगावे, वनमाला जाधव, सविता वागदरे, राधा नितनवरे आदींच्या स्वाक्षर्या आहेत़चौकट़़़बुधवारी महिलांनी विरोध दर्शवित जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतली़ दरम्यान, बियरबारला नाहरकत प्रमाणपत्र द्यावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या नगरसेवकांनी गुरुवारी मुख्याधिकार्यांना पत्र देऊन मी हा ठराव मांडला नाही़ माझ्या नावाचा वापर करुन षडयंत्र रचण्यात येत असल्याचे या नगरसेवकांनी म्हटले आहे़ आमचा या बिअरबारला आणि परमीट रुमला विरोध असल्याचेही स्पष्ट केले आहे़