आपणच देणार लढाऊ विमानांना ‘ताकद’; संरक्षण क्षेत्राला आणखी बळकटी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 05:35 AM2023-11-21T05:35:32+5:302023-11-21T05:36:06+5:30

संरक्षण क्षेत्राला आणखी बळकटी मिळणार

We will now give 'strength' to the fighter planes; Further strengthening of the defense sector | आपणच देणार लढाऊ विमानांना ‘ताकद’; संरक्षण क्षेत्राला आणखी बळकटी

आपणच देणार लढाऊ विमानांना ‘ताकद’; संरक्षण क्षेत्राला आणखी बळकटी

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : हलके लढाऊ विमान एलसीए मार्क २ (तेजस एमके २) व स्वदेशी प्रगत मध्यम लढाऊ विमानाच्या पहिल्या दोन स्क्वाड्रनचे इंजिन आता देशातच तयार केले जातील. भारताचे संरक्षण क्षेत्र बळकट करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला 
जात आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) प्रमुख डॉ. समीर व्ही. कामत यांनी शनिवारी (दि. १८) सांगितले की, अमेरिकन कंपनी जीई एरोस्पेस आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) संयुक्तपणे ही इंजिने तयार करणार आहेत. त्याच्या सर्व मंजुरी अमेरिकेकडून मिळाल्या आहेत. एलसीए मार्क २ मिराज, जग्वार आणि मिगची जागा घेईल. 

कोणती विमाने भारतात बांधणार?
nसंरक्षण विषयक मंत्रिमंडळीय समितीने यावर्षी ३० ऑगस्ट रोजी एलसीए मार्क २ लढाऊ विमानाच्या निर्मितीला मंजुरी दिली होती.
nहे विमान टप्प्याटप्प्याने मिराज २०००, जग्वार व मिग-२९ लढाऊ विमानांची जागा घेईल. एलसीए मार्क २ हे विमान २०२७ पर्यंत बांधले जाईल.

नवीन विमानांसाठी भारताची तयारी
डीआरडीओ जीई-४१४ इंजिन असलेले विमान विकसित करणार आहे. जीई-४१४ हे जीई-४०४ ची प्रगत आवृत्ती आहे. जीई-४०४ इंजिन सध्याच्या एलसीएएस आणि ८३ एलसीए मार्क १ एएस मध्ये बसवलेले आहे. 

८३ एलसीए मार्क १ ए एस पुढील काही वर्षांत भारतीय हवाई दलात समाविष्ट होईल. सध्या ३० एलसीए भारतीय हवाई दलाच्या सेवेत आहेत. एचएएल मार्क १ए विकसित करण्यासाठी यापैकी दोन वापरत आहे.

सरकारची मंजुरी...
एलसीए मार्क २ लढाऊ विमान प्रकल्पाला सरकारची मंजुरी मिळाली आहे. यासाठी डिझायनर्सना १७.५ टन क्षमतेचे सिंगल इंजिनचे विमान डिझाइन करावे लागेल.
 

Web Title: We will now give 'strength' to the fighter planes; Further strengthening of the defense sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.