हम कल हो न हो...! शेरोशायरी म्हणत दिल्लीची निवडणूक जाहीर; निवडणूक आयुक्त वेगळ्याच अंदाजात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 14:59 IST2025-01-07T14:58:25+5:302025-01-07T14:59:09+5:30

Delhi Assembly Election Dates: मतदार यादीत चुकीच्या नोंदी केल्याचे आरोप ऐकून मन दुखावते, असे राजीव कुमार म्हणाले. 

We will remain, or not...! Delhi Assembly elections date announced with a poem; Election Commissioner has a different form, reject allegation on EVM, Voter list... | हम कल हो न हो...! शेरोशायरी म्हणत दिल्लीची निवडणूक जाहीर; निवडणूक आयुक्त वेगळ्याच अंदाजात...

हम कल हो न हो...! शेरोशायरी म्हणत दिल्लीची निवडणूक जाहीर; निवडणूक आयुक्त वेगळ्याच अंदाजात...

निवडणूक काळात आम्ही बोलू शकत नाही असे सांगत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ईव्हीएम बाबतच्या सर्व आरोप, तक्रारी या खोट्या असल्याचे सांगितले. याचबरोबर दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची घोषणाही केली आहे. 

ईव्हीएमशी छेडछाड करण्याच्या चर्चेला काही फायदा नाही. ईव्हीएम हॅक करता येत नाही, हे न्यायालयाने मान्य केले आहे. मात्र ईव्हीएमवर संशय निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. निवडणुकीच्या सात-आठ दिवस आधी ईव्हीएम तयार असतात. एजंटसमोर ईव्हीएम सील केले जाते. मतदानानंतर ईव्हीएम सील केले जातात. ईव्हीएममध्ये अवैध मतांची शक्यता नाही. ईव्हीएमची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे, असे कुमार म्हणाले. 

दिल्लीची ही ईव्हीएम निवडणूक असल्याचे सांगण्यात आले. मतदार यादीतून नावे वगळल्याची तक्रार करण्यात आली आहे. मतमोजणी संथगतीने होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवडणूक आयोगावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रश्नांची उत्तरे देणे ही आपली जबाबदारी आहे. पारदर्शकता ही आमची प्राथमिकता आहे. मतदार यादीत चुकीच्या नोंदी केल्याचे आरोप ऐकून मन दुखावते, असे राजीव कुमार म्हणाले. 

परंतू, यावर उद्या असू किंवा नाही माहिती नाही, यामुळे आजच यावर उत्तर देणे गरजेचे आहे, असेही कुमार यांनी स्पष्ट केले. ''आरोप और इल्जामात का दौर चले, कोई गिला नहीं,झूठ के गुब्बारों को बुलंदी मिलें, कोई शिकवा नहीं,हर परिणाम में प्रमाण देते है,पर वो बिना सबूत शक की नई दुनिया रौनक करते हैं और शक का इलाज तो हकीम लुकमान के पास भी नहीं!'', अशी शेरोशायरी देखील केली. 
''सब सवाल अहमियत रखते हैं जवाब तो बनता है आदतन कलमबंद जवाब देते रहे, आज तो रू-ब-रू भी बनता है क्या पता हम कल हो न हो, आज जवाब तो बनता है'', असेही त्यांनी म्हटले.

मतदान संपण्यापूर्वी मतदान अधिकाऱ्यांना अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे अंतिम मतदानाच्या टक्केवारीशी संध्याकाळी 5 वाजताच्या आकड्यांची तुलना करणे योग्य नाही. मतदान संपल्यानंतर, प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदान प्रतिनिधींना फॉर्म 17C दिला जातो. या फॉर्ममध्ये त्या मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाची नोंद असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. महिलांबद्दल असभ्य भाषा वापरू नका. निवडणूक प्रचारात भाषेची काळजी घ्या, असा सल्लाही त्यांनी राजकीय पक्षांना, नेत्यांना दिला. 

दिल्लीत निवडणूक कधी....
दिल्लीत ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. यावेळीही दिल्लीची निवडणूक एकाच टप्प्यात पूर्ण होणार आहे. विधानसभेच्या सर्व 70 जागांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. 

 

Web Title: We will remain, or not...! Delhi Assembly elections date announced with a poem; Election Commissioner has a different form, reject allegation on EVM, Voter list...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.