मुत्सद्दीपणे पाकिस्तानशी संपर्कात राहायला आवडेल; परराष्ट्र मंत्रालयाने मांडली बाजू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 06:08 PM2019-09-12T18:08:14+5:302019-09-12T18:11:51+5:30
दुसऱ्यांदा काऊन्सिलर अॅक्सेस देण्यास पाकिस्ताननं नकार दिला आहे.
नवी दिल्ली - भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना दुसऱ्यांदा काऊन्सिलर अॅक्सेस देण्यास पाकिस्ताननं नकार दिला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांनी ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय न्यायालयानं झटका दिल्यानंतर पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना पहिल्यांदा काऊन्सिलर अॅक्सेस दिला होता. गेल्या आठवड्यात भारताच्या उप उच्चायुक्त गौरव अहलूवालिया यांनी कूलभूषण जाधव यांची भेट घेतली होती. दोघांत जवळपास दोन तास चर्चा झाली होती. सुरक्षेच्या कारणास्तव चर्चेचे ठिकाण जाहीर केलेले नाही. ही भेट इस्लामाबादमधील एका अज्ञात ठिकाणी झाल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. कूलभूषण यांना २०१६ साली अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच सुमारे तीन वर्षांनंतर कूलभूषण यांनी कॉउन्सिलर अॅक्सेस मिळाला होता. मात्र, आज पाकिस्तानने पुन्हा काऊन्सिलर अॅक्सेस देण्यास नकार दिल्याने भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालाची पूर्णपणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जाईल. आम्हाला मुत्सद्दीपणे वेगवेगळ्या माध्यमांतून पाकिस्तानच्या संपर्कात राहायला आवडेल सांगितले.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं आज साप्ताहिक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी कुलभूषण जाधव यांना काऊन्सिलर अॅक्सेस दिला जाणार नाही, अशी माहिती दिली. 2 सप्टेंबरला जाधव यांना काऊन्सिलर अॅक्सेस देण्यात आला होता. त्यावेळी राजदूत गौरव अहलुवालिया यांनी अज्ञात स्थळी जाधव यांची भेट घेतली होती. एका तुरुंगात ही भेट झाली. निश्चित वेळेच्या एक तासानंतर पाकिस्ताननं जाधव यांना अहलुवालिया यांना भेटू दिलं. ही भेट परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात होईल, असं पाकिस्ताननं आधी सांगितलं होतं. मात्र शेवटच्या क्षणी पाकिस्ताननं भेटीचं ठिकाण बदललं.
भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावरुन दबाव आणल्यामुळे पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना त्यांच्या आई आणि पत्नीला भेटण्याची परवानगी दिली. मात्र यावेळी पाकिस्ताननं जाधव यांच्या आई आणि पत्नीला अतिशय वाईट वागणूक दिली. कुलभूषण जाधव यांना भेटण्याआधी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांच्या आई आणि पत्नीला मंगळसूत्र काढायला सांगितलं. यानंतर काही दिवसांनी पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. यामध्ये कुलभूषण स्वत:ला हेर म्हणत होते. मात्र, हा व्हिडीओ पाकिस्ताननं दबावाखाली तयार केल्याचा आरोप झाला होता.
Raveesh Kumar, MEA on Pakistan Ministry of Foreign Affairs' statement,"There would be no 2nd consular access to Kulbhushan Jadhav": We will keep trying that judgement of ICJ is fully implemented. We would like to remain in touch with the Pakistani side through diplomatic channels pic.twitter.com/vcuYB8gpXg
— Prasar Bharati News Services (@PBNS_India) September 12, 2019