PM Modi Kumbh Snan: महाकुंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्रिवेणी संगमात केलं पवित्र स्नान, वेशभूषेने वेधून घेतलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 12:19 IST2025-02-05T12:09:27+5:302025-02-05T12:19:50+5:30

PM Narendra Modi Mahakumbh Snan: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहत त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं.

Wearing saffron and holding a garland of Rudraksha beads, Prime Minister Narendra Modi took a holy dip in the Triveni Sangam. | PM Modi Kumbh Snan: महाकुंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्रिवेणी संगमात केलं पवित्र स्नान, वेशभूषेने वेधून घेतलं लक्ष

PM Modi Kumbh Snan: महाकुंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्रिवेणी संगमात केलं पवित्र स्नान, वेशभूषेने वेधून घेतलं लक्ष

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहत त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार प्रयागराज येथे आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्नानावेळची वेशभूषाही वैशिष्ट्यपूर्ण आणि लक्षवेधी होती.

आज सकाळी दिल्लीहून विमानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रयागराज येथे पोहोचले. नियमितपणे कुर्ता पायजमा आणि जॅकेट परिधान करणारे नरेंद्र मोदी मोदी हे महाकुंभमेळ्यामध्ये थोड्या वेगळ्याच रूपात दिसले. यावेळी नरेंद्र मोदींसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते. नरेंद्र मोदी हे निषादराज क्रूजमधून संगमाजवळ पोहोचले. तिथे गळ्यात केसरी उपरणं आणि हातात रुद्राक्षांच्या माळा परिधान करून त्यांनी त्रिवेणी संगमान स्नान केलं. यावेळी महाकुंभानिमित्त संगमतटावर आलेल्या लाखो भाविकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी उत्सुकता दिसून येत होती.

यादरम्यान, सीआरपीएफ आणि लष्कराच्या जवानांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. १३ जानेवारीपासून प्रयागराज येथील त्रिवेणी संगमाजवळ सुरू झालेल्या महाकुंभमेळ्यामध्ये आतापर्यंत ३९ कोटीहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधी गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं आहे.  

Web Title: Wearing saffron and holding a garland of Rudraksha beads, Prime Minister Narendra Modi took a holy dip in the Triveni Sangam.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.