Weather Alert : ऋतूचक्र बदलतंय! थंडीतही पुढचे 5 दिवस 'या' राज्यांत पाऊस बरसणार; तापमानात वाढ होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 10:42 AM2022-02-18T10:42:24+5:302022-02-18T10:53:20+5:30

Weather Alert : पुढील काही आठवड्यांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) पावसाबाबत अलर्ट जारी केला आहे.

weather alert rain alert in north east and central india | Weather Alert : ऋतूचक्र बदलतंय! थंडीतही पुढचे 5 दिवस 'या' राज्यांत पाऊस बरसणार; तापमानात वाढ होणार 

Weather Alert : ऋतूचक्र बदलतंय! थंडीतही पुढचे 5 दिवस 'या' राज्यांत पाऊस बरसणार; तापमानात वाढ होणार 

Next

नवी दिल्ली - देशभरात थंडीचा हंगाम जवळपास संपत आला आहे. यानंतर आता पुढील काही आठवड्यांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) पावसाबाबत अलर्ट जारी केला आहे. देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये पाऊस पडेल  असं म्हटलं आहे. तर येत्या पाच दिवसांत पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पाऊस पडेल. तसेच झारखंड, ओडिशा आणि बिहारमध्ये 20-21 फेब्रुवारीला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

स्कायमेट हवामानानुसार, मध्य आणि पूर्व भारत दोन्ही भागात पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशातून आजपासून पाऊस सुरू होणार असून तो 19 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. यानंतर 19 आणि 21 फेब्रुवारीला छत्तीसगडच्या भागात पाऊस पडेल. यानंतर 20 आणि 21 फेब्रुवारीला ओडिशा, बिहार, झारखंड आणि गंगा पश्चिम बंगालसह देशाच्या पूर्वेकडील भागात पाऊस होऊ शकतो.

हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये जोरदार वारे वाहू शकतात

हवामान खात्यानुसार, 19 आणि 20 फेब्रुवारीला हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये जोरदार वारे वाहू शकतात. त्याचा वेग ताशी 25-35 किलोमीटर असण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर हिमाचल प्रदेश आणि काश्मीरच्या काही भागात पाऊस पडू शकतो. भारतीय हवामान विभाग (IMD) ने म्हटले आहे की, दक्षिण द्वीपकल्प आणि अंदमान आणि निकोबार बेटांच्या काही भागात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

येत्या पंधरवड्यापासून संपूर्ण देशात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

हवामान खात्याने गुरुवारी थंडीनंतर आता येत्या पंधरवड्यापासून संपूर्ण देशात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पुढील दोन आठवड्यांच्या अंदाजात, IMD ने म्हटले आहे की, आठवड्यातील बहुतेक दिवस देशातील उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची अपेक्षा आहे. 24 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान देशातील बहुतांश भागात किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची अपेक्षा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: weather alert rain alert in north east and central india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.