बलात्कारी हे भुईला भार; जिवंत राहाण्याचा त्यांना अधिकारच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 05:13 AM2018-06-30T05:13:17+5:302018-06-30T05:13:20+5:30

बलात्कारी हे भुईला भार असून त्यांना जिवंत राहाण्याचा अधिकारच नाही, असे संतप्त उद्गार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी येथे काढले

Weaver is the land mass; They have no right to live | बलात्कारी हे भुईला भार; जिवंत राहाण्याचा त्यांना अधिकारच नाही

बलात्कारी हे भुईला भार; जिवंत राहाण्याचा त्यांना अधिकारच नाही

Next

भोपाळ : बलात्कारी हे भुईला भार असून त्यांना जिवंत राहाण्याचा अधिकारच नाही, असे संतप्त उद्गार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी येथे काढले. मंदसौर येथे आठ वर्षांच्या बालिकेचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्या घटनेचा चौहान यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
चौहान ते म्हणाले की, बलात्कार प्रकरणांचे खटले जलदगती न्यायालयात चालविले जावेत, अशी तरतूद राज्य सरकारने केली आहे. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयानेही असेच करावे, अशी विनंती राज्य सरकारने केली आहे. तसे झाल्यास बलात्कार प्रकरणांतील आरोपींना अतिशय कडक शिक्षा लवकरात लवकर सुनावता येईल.
१२ वर्षे व त्याखालील वयाच्या मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली जावी, असे विधेयक मध्य प्रदेश विधानसभेने गेल्या वर्षी एकमताने मंजूर केले होते. मंदसौर बलात्कार प्रकरणाबद्दल चौहान म्हणाले की, ही वेदनादायी घटना आहे. बलात्कारित मुलीवर उपचार सुरु असून, तिची प्रकृती सुधारत आहे.
बलात्कारित बालिकेला बसला जबरदस्त मानसिक धक्का
मंदसौरच्या त्या बालिकेला या घटनेचा जबरदस्त मानसिक धक्का बसला. त्यामुळे धड बोलूही शकत नाही, असे तिच्यावर उपचार करणाºया इंदूरच्या एमवाय हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सांगितले. या बालिकेच्या गुप्तांगात आरोपीने रॉड किंवा काठीही घुसविली असावी असे तपासणीअंती डॉक्टरांचे मत झाले. तिच्यावर आतापर्यंत दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

मंदसौर येथे मंगळवारी घरी जाण्यासाठी शाळेच्या बाहेर पालकांची वाट पाहात उभ्या असलेल्या या बालिकेचे इरफान उर्फ भैय्यू (२०) याने अपहरण करून तो तिला बस स्थानकाजवळील झुडपांच्या मागे घेऊन गेला व तिच्यावर बलात्कार केला.
स्थानिक बाजारपेठेत मजूर म्हणून काम करत असलेल्या इरफानला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाने दिल्लीत २०१२ साली नर्सिंगच्या एका विद्यार्थिनीवर सहा जणांनी सामुदायिक बलात्कार केला होता, त्याच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.

Web Title: Weaver is the land mass; They have no right to live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.