प्रवाशांच्या तक्रारी आणि सूचनांसाठी रेल्वेने लाँच केलं वेबपोर्टल

By admin | Published: July 7, 2017 11:25 AM2017-07-07T11:25:28+5:302017-07-07T11:25:28+5:30

प्रवाशांच्या तक्रारी आणि सूचनांसाठी रेल्वेने वेब पोर्टल तयार केलं आहे.

Web portal launched by Railways for passenger complaints and suggestions | प्रवाशांच्या तक्रारी आणि सूचनांसाठी रेल्वेने लाँच केलं वेबपोर्टल

प्रवाशांच्या तक्रारी आणि सूचनांसाठी रेल्वेने लाँच केलं वेबपोर्टल

Next

ऑनलाइन लोकमत

इंदौर, दि. 7- रेल्वेतून प्रवास करत असताना ट्रेनमध्ये किंवा स्टेशनवर प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणींची माहिती रेल्वेपर्यंत पोहचविण्यासाठी रेल्वेने नवी सुविधा सुरू केली आहे. प्रवासी आता प्रवासादरम्यान त्यांना आलेल्या अडचणींची तक्रार थेट ऑनलाइन करू शकणार आहेत. प्रवाशांच्या तक्रारी आणि सूचनांसाठी रेल्वेने वेबपोर्टल तयार केलं आहे. प्रवाशांच्या तक्रारी तातडीने सोडविण्यासाठी रेल्वेकडून हे वेबपोर्टल लाँच करण्यात आलं आहे. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.
 
स्मार्टफोन किंवा कॉम्युटरवरून वापरता येणाऱ्या तक्रारी आणि सूचनांसाठीच्या बेवपोर्टलवर प्रवाशांसाठी एक पर्याय देण्यात आला आहे, ज्यामध्ये तक्रारदाराच्या तक्रारीवर काय हालचाली झाल्या हे समजू शकणार आहे.
 
"रेल्वेकडून प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधा जास्त कार्यक्षमपणे त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी या वेबपोर्टलचा उपयोग होइल, तसंच वेबपोर्टलवर प्रवाशांनी दिलेल्या चांगल्या सूचना रेल्वेच्या नियमात बसल्या तर त्याची अंमलबजावणीही केली जाइल", अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 
 
रेल्वे संदर्भातील तक्रार किंवा सूचना नोंदविण्यासाठी http://www.coms.indianrailways.gov.in  या वेबसाइटवर जाऊन कम्प्लेन्ट अॅण्ड सजेशन्स या पर्यायावर क्लिक करून प्रवासी आपली तक्रार किंवा सूचना नोंदवू शकतात.
 
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जी व्यक्ती वेबपोर्टलवर तक्रार दाखल करेल त्याला एक युनिक कम्प्लेन्ट आयडी दिला जाइल. या आयडीनुसार तक्रारदार त्याने दाखल केलेल्या तक्रारीत काय प्रगती झाली हे तपासू शकतो. प्रवाशाने वेब पोर्टलवर एखाद्या स्टेशन संदर्भातील तक्रार नोंदविल्यानंतर ती तक्रार ऑनलाइन तक्रारीत नमूद केलेल्या रेल्वे स्टेशनवर किंवा रेल्वेच्या विभागात निवारणासाठी जाणार आहे. 

आणखी वाचा
 

मोदींच्या इस्त्रायल दौ-यात दोन्ही देशात 4.3 अब्ज डॉलरचे करार

प्रामाणिक व्यावसायिकांसाठी जीएसटी फायदेशीर-उमेश शर्माआश्चर्य.. रोबोटने वाचवले कपाटाखाली सापडणाऱ्या मुलीला

वेबपोर्टलवरून तक्रार नोंदविताना प्रवाशाला त्याच्या तक्रारीबरोबरच त्याचा पीएनआर नंबर, स्टेशनचं नाव, ट्रेनचा नंबर अशी मुलभूत माहिती पुरवावी लागणार आहे. ही माहिती भविष्यातील वापरासाठी संग्रहीत केली जाणार आहे. 

पश्चिम रेल्वेच्या रत्लाम विभागानने प्रवाशांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी ट्विटरचाही वापर करायला सुरूवात केली आहे. गेल्या वर्षी दोन हजार पेक्षा जास्त तक्रारी ट्विटरवरून त्यांच्याकडे आल्या होत्या.  
 

 

Web Title: Web portal launched by Railways for passenger complaints and suggestions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.