नथुराम गोडसेवर वेबसाईट सुरु, हिंदू महासभेने तयार केली वेबसाईट

By admin | Published: November 15, 2015 07:41 PM2015-11-15T19:41:40+5:302015-11-15T19:41:51+5:30

महात्मा गांधींजीची हत्या करणारा नथुराम गोडसेच्या पुण्यतिथीनिमित्त हिंदू महासभेने गोडसेंवर आधारित वेबसाईट सुरु केल्याने वाद निर्माण झाला आहे.

Website started by Nathuram Godsev, created by Hindu Mahasabha website | नथुराम गोडसेवर वेबसाईट सुरु, हिंदू महासभेने तयार केली वेबसाईट

नथुराम गोडसेवर वेबसाईट सुरु, हिंदू महासभेने तयार केली वेबसाईट

Next

ऑनलाइन लोकमत 

मेरठ, दि. १५ -  महात्मा गांधींजीची हत्या करणारा नथुराम गोडसेच्या पुण्यतिथीनिमित्त हिंदू महासभेने गोडसेंवर आधारित वेबसाईट सुरु केल्याने वाद निर्माण झाला आहे. नथुराम गोडसे - द रिअल फॉरगॉटन हिरो असे शीर्षकच वेबसाईटवर देण्यात आले असून पुण्यतिथीदिनी महासभेतर्फे देशभरात १२० हून अधिक ठिकाणी हवनही करण्यात आले. 
हिंदू महासभेने महात्मा गांधीजींची हत्या करणा-या नथुराम गोडसेचा मृत्यूदिवस (१५ नोव्हेंबर) बलिदान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. रविवारी हिंदू महासभेने गोडसेवर आधारित www.nathuramgodse.in. ही वेबसाईट सुरु केली. गोडसेविषयी सखोल माहिती वेबसाईटवर देण्यात आली असून यावरुन सर्वसामान्यांना गोडसेविषयी भूमिका घेण्यास मदत होईल असे विश्व हिंदूपीठाचे अध्यक्ष मदन आचार्य यांनी सांगितले. नथुराम गोडसे यांच्या 'गांधीजींची हत्या का व त्याचे बंधू गोपाळ गोडसे यांच्या 'गांधी वध आणि मी' या पुस्तकाच्या स्कॅन कॉपीही वेबसाईटवर अपलोड करण्यात आल्या आहेत. वेबसाईटसाठी आयटीतील सहा जणांची टीम नेमण्यात आली असून सोशल मिडीयावर नथुराम गोडसेविषयी चर्चा करण्याची कामही त्यांच्याकडे देण्यात आल्याचे समजते. गोडसेवर आधारित चित्रपटाच्या सीडी वितरित करु असे हिंदू महासभेने म्हटले होते. मात्र तांत्रिक कारणांमुळे ही सीडी वितरित करण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. 
 

Web Title: Website started by Nathuram Godsev, created by Hindu Mahasabha website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.