अमेरिकेत नवरा-नवरी, पै पाहुण्यांनी गावी केला रीतिरिवाज; टिव्हीवर ऑनलाईन लग्नसोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 09:00 PM2023-03-21T21:00:12+5:302023-03-21T21:22:01+5:30
अमेरिकेत राहून लग्न केलेल्या या जोडप्याच्या विवाहाची जोरदार चर्चा रंगली आहे.
चंडीगढ - सात समुदापलिकडे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय अमितने तेथेच राहत असलेल्या पण मूळची करनालची रहिवाशी असलेल्या अंशुसोबत सात फेरे घेतले. या लग्नाचं वैशिष्ट म्हणजे अमितचं मूळ गाव असलेल्या सोनीपतच्या सांदल येथून लग्नाचं वऱ्हाड करनाल येथे पोहोचलं होतं. तिकडे अमेरिकेत लग्नसोहळा पार पडला अन् इकडे पारंपरिक पद्धतीने सर्वकाही विधीवत पूर्ण झाले. या लग्नासाठी नवरा आणि नवरीकडील नातेवाईक आणि पाहुणे मंडळी आली होती. वऱ्हाडासोत ना नवरदेव घोड्यावर गेला किंवा नवरी गाडीत नवरदेवाच्या घरी आली. पण, सगळं काही शुभमंगल सावधान घडलं.
अमेरिकेत राहून लग्न केलेल्या या जोडप्याच्या विवाहाची जोरदार चर्चा रंगली आहे. विदेशात राहूनही आपली परंपरा आणि संस्कार जपत एकदम हरयाणवी स्टाईलमध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला. हरयाणातील सोनीपत येथे सर्वकाही रितीरिवाजानुसार पार पडले. अमेरिकेत बसलेल्या नवरदेव आणि नवरी मुलीने हा लग्नसोहळा टिव्हीच्या स्क्रीनवर ऑनलाईन पाहिला. तर, इकडच्या मंडळींनीही त्या जोडप्याला ऑनलाईच आशीर्वाद दिले.
अमित आणि आंशु यांनी साता समुद्रापार विवाहसोहळ्यात ७ फेरे घेत सात जन्म एकत्र राहण्याचे वचन घेतले. सोनीपतमधील एका लहानशा गावातून अमेरिकेत स्थीरावत अमितने केवळ स्वत:ला सिद्धच केलं नाही, तर आज अनोख्या पद्धतीने केलेल्या या लग्नामुळेही तो सर्वांना परिचीत झाला. अमित लाकडा हा आशु हे अमेरिकेतच स्वत:च्या वेगवेगळ्या कंपनी बनवून काम करत आहेत. २०१४ मध्ये अमितने मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी ज्वॉईन केली होती. त्यानंतर, अनेक देशांत नोकरी केल्यानंतर आता ट्रेकींग कंपनी सुरू करुन तो अमेरिकेत स्थिरावला आहे.