एका लग्नाची अजब गोष्ट ! मास्क,सॅनिटायझर लावत घेतले सप्तपदी, तर आठवे वचन वाचून व्हाला आवाक !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 11:53 AM2020-05-20T11:53:55+5:302020-05-20T11:55:31+5:30
भारतातच सध्या लॉकडाऊनमध्येही काही ठिकाणी जोरात लगीनघाई सुरू आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता संपूण देशात लॉकडाऊन आहे. सण, समारंभ सगळ्यांवरच बंदी आहे. लग्न सोहळ्यांचेही तेच. लॉकडाऊनमुळे अनेकांचे नियोजित लग्नसोहळे लांबणीवर पडलेत. तर काहींनी अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थित साध्या पद्धतीने लग्न उरकले. त्यामुळे भारतातच सध्या लॉकडाऊनमध्येही काही ठिकाणी लगीनघाई सुरू आहे.
Rajasthan: A couple tied the knot in Bhadwasiya, Jodhpur yesterday amid #CoronaLockdown. Neetu, the bride said, "We followed social distancing norms & wore masks. Everyone should wear masks to contain the spread of #COVID19". pic.twitter.com/PkvVeXU6F8
— ANI (@ANI) May 19, 2020
करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक गोष्टींवर निर्बंध लावले आहेत. मात्र मोठ्या प्रमाणावर न होणारे लग्न समारंभ आता अवघ्या पाच ते सहा लोकांमध्येच उरकल्याची अनेक उधाहरणे आहे. सोशल डिस्टंसिंग पाळत तसेच स्वच्छतेकडे दुर्लक्ष न करता अजब-गजब युक्त्या लढवत लग्न केले जात आहे. कोणी मास्क लावत सप्तपदी घेत आहेत. तर कोणी ठराविक अंतर ठेवण्यासाठी लाकडाच्या काठ्यांनीच एकमेकांच्या गळ्यात माळा घालत असल्याचे पाहायला मिळत आहे.
असाच प्रकार राजस्थानमध्येही घडत आहे. लग्नासाठी आणखीन काही दिवस थांबायची कोणाचीही मानसिक तयारी नाही मग अगदी मोजक्याच लोकात अशा प्रकारे लग्न पार पडत आहेत. राजस्थानमधील जयपुरमध्ये असेच लग्नसमारंभ पार पडले. या लग्नात सात वचनमध्ये आणखीन एक आठवे वचन या जोडप्याने घेतले. लग्नात दोघांनी मास्क घालूनच लग्नाच्या विधी पूर्ण केल्या तर भविष्यातही कोरोनापासून बचावासाठी दोघेही मास्क आणि सॅनिटायझर लावत योग्य खबरदारी घेणार असल्याचीही शपथ घेतली.
नवरा मुलगा स्वतः बाईकवर लग्नमंडपात पोहचला, यावेळी हाताच्या बोटावर मोजणार इतकीच लोक उपस्थित होते. यावेळी तलवारच्या सहाय्याने दोघे वधू-वरांनी एकमेकांना हार घालत लग्न उरकले.