Food Poisoning: लग्नसोहळ्यातील जेवण पडलं महागात, २०० जणांना उलट्या, जुलाब, अनेक जण रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 09:27 AM2022-05-03T09:27:50+5:302022-05-03T09:28:57+5:30
Food Poisoning in Wedding: एका विवाह सोहळ्यात भोजन केल्यानंतर सुमारे २०० जणांची प्रकृती बिघडली आहे. काही लोकांना अचानक उलट्या आणि जुलाब लागले. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागामध्ये खळबळ उडाली आहे.
भोपाळ - मध्य प्रदेशमधील देवास जिल्ह्यामध्ये झालेल्या एका विवाह सोहळ्यात भोजन केल्यानंतर सुमारे २०० जणांची प्रकृती बिघडली आहे. काही लोकांना अचानक उलट्या आणि जुलाब लागले. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागामध्ये खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने तात्काळ घटनास्थळी पथक पाठवून तपासणी केली. तर अधिकच प्रकृती बिघडलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मात्र यामधील कुणाहीची प्रकृती गंभीर नसल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना बरोठा क्षेत्रातील गुराडियाभील गावातील आहे. येथे रविवारी एका लग्नामध्ये शेकडो लोक सभागी झाले होते. येथे समारोहात होणाऱ्या या विवाहाचा संयुक्त कार्यक्रम होणार होता.
कार्यक्रमापूर्वी लग्नात आलेल्या पाहुण्यांनी भोजन केलं. त्यानंत सर्व लोग आपापल्या कामात गुंतले. रविवारी संध्याकाळ होताच काही जणांना उलट्या आणि जुलाबाची तक्रार होऊ लागली. मात्र १-२ लोकांवर गावाताच खासगी डॉक्टरांनी उपचार केले.
त्यानंतर अचानक आजारी लोकांची संख्या वाढू लागली. अनेकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. बघता बघता २०० जणांची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिथे खळबळ उडाली. या घटनेची माहिती आरोग्य विभागाला दिली गेली. रविवारी आरोग्य विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि सर्वांचे परीक्षण केले.
सीएमएचओ एमपी शर्मा यांनी सांगितले की, उलट्या आणि जुलाबाच्या तक्रारीमुळे २०० जण आजारी असल्याची तक्रार मिळाली होती. त्यानंतर आरोग्य विभागाचे पथक रात्रीच पाठवले होते. रविवारी रात्री येथील परिस्थिती नियंत्रणात आली. खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारीही गावात सर्व्हे करण्यात आला.