वजनदार झेप!

By admin | Published: June 6, 2017 06:23 AM2017-06-06T06:23:17+5:302017-06-06T06:23:17+5:30

आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवीत भारताने सोमवारी आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून इतिहासाचे नवे पान लिहिले.

Weighty leap! | वजनदार झेप!

वजनदार झेप!

Next

श्रीहरीकोटा (आंध्र प्रदेश) : एकेकाळी भारताला अंतराळ तंत्रज्ञान देण्यास नकार देणाऱ्या देशांना आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवीत भारताने सोमवारी आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून इतिहासाचे नवे पान लिहिले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) श्रीहरीकोटातील सतीश धवन स्पेस सेंटर येथून स्वदेशी बनावटीच्या
3136 किलो वजनाच्या ‘जी सॅट -१९’ उपग्रहाचे ‘जीएसएलव्ही मार्क ३’ या रॉकेटच्या साहाय्याने श्रीहरीकोटातून यशस्वी प्रक्षेपण केले. 200 हत्तींएवढे वजन  या उपग्रहाचे वजन पाच लोडेड बोइंग जम्बो जेटएवढे किंवा पूर्ण वाढ झालेल्या २०० हत्तींइतके आहे.शास्त्रज्ञांनी या ‘जीएसएलव्ही मार्क३’ला बाहुबली म्हटले आहे.
या यशाचे महत्त्व का?
भारताला २३०० किलोपेक्षा जास्त वजनाचे उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी यापूर्वी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावे लागत होते. आता भारताला ४००० किलोंचे उपग्रहही अवकाशात सोडता येणार आहेत. त्यामुळे या क्षेत्रात देशाला स्वयंपूर्णता मिळणार आहे.
जीसॅट १९ उपग्रहामुळे संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती होणार आहे. तसेच भारतातील इंटनेटचा वेग वाढण्यास मदत होणार आहे.
आजचा दिवस ऐतिहासिक आहे. हा पहिलाच प्रयत्न होता आणि तो यशस्वी झाला आहे. या प्रक्षेपणासाठी पूर्ण टीमने अविरतपणे काम केले त्याबद्दल मी टीमचे अभिनंदन करतो.
- ए. एस. किरण कुमार, इस्रोचे अध्यक्ष
इस्रोच्या या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी टीममधील सर्व सदस्यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Weighty leap!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.