चीनचा दबाव धुडकावून भारत करणार दलाई लामांचे स्वागत
By admin | Published: March 3, 2017 08:03 PM2017-03-03T20:03:50+5:302017-03-03T20:35:33+5:30
दलाई लामांवरून चीनने दिलेला इशारा भारताने पुन्हा एकदा धुडकावून लावला आहे. दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यादरम्यान भारत चीनचा
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - दलाई लामांवरून चीनने दिलेला इशारा भारताने पुन्हा एकदा धुडकावून लावला आहे. दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यादरम्यान भारत चीनचा विरोध धुडकावून लावत लामांचे स्वागत करणार आहे. दलाई लामा हे धार्मिक यात्रेसाठी अरुणाचल प्रदेशमध्ये येत आहेत, असे याबाबत भारताने स्पष्ट केले आहे.
भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे आणि दलाई लामा यांना देशाच्या कुठल्याही भागात जाण्यापासून रोखले जाऊ शकन नाही, अशी भूमिका भारताकडून घेण्यात आली आहे. भारताच्या या भूमिकेमुळे भारत आणि चीनमधील संबंध अधिकच ताणले जाण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत दहशतवादी मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव आणि एनएसजीमधील भारताचे सदस्यत्व या दोन मुद्यांवरून दोन्ही देशामधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. आता भारताची दलाई लामांसंदर्भातील भूमिका ही चिथावणीखोर असल्याचा दावा चिनी प्रसारमाध्यमांनी केला असून, त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिकच बिघडतील, असे चिनी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.