मध्यमवर्गीय, शेतकर्यांकडून अर्थसंकल्पाचे स्वागत
By admin | Published: February 29, 2016 10:02 PM2016-02-29T22:02:21+5:302016-02-29T22:02:21+5:30
जळगाव- मध्यवर्गीय, शेतकर्यांनी बजेटचे स्वागत केले आहे. सिंचनासाठी केलेली तरतूद मात्र पुरेशी नाही. शेतकर्यांचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करण्याचे प्रयत्न करताना मूलभूत सुविधांबाबत हात आखडता घ्यायला नको, असेही शेतकरी, मध्यवर्गीयांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
Next
ज गाव- मध्यवर्गीय, शेतकर्यांनी बजेटचे स्वागत केले आहे. सिंचनासाठी केलेली तरतूद मात्र पुरेशी नाही. शेतकर्यांचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करण्याचे प्रयत्न करताना मूलभूत सुविधांबाबत हात आखडता घ्यायला नको, असेही शेतकरी, मध्यवर्गीयांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. उत्पन्न दुप्पटशेतकर्यांचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करण्याचे उद्दीष्ट या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केंद्राने ठेवले आहे. शेतकर्यांचा विचार या अर्थसंकल्पात झाल्याचे यावरून दिसते. परंतु उत्पन्न दुप्पट करीत असताना खर्च मात्र आज आहे तसाच राहावा. नाही तर उत्पादन खर्चामधील वाढ ही डोकेदुखी कायम राहील. खते, बियाण्यासंबंधी स्पष्ट धोरण दिसत नाही. कडूजी पाटील, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटनासिंचनावर तरतूद कमीसिंचनावर सरकार वर्षभरात १७ हजार कोटी उपलब्ध करून देणार आहे. आपल्याकडी महाकाय प्रकल्प किंवा यासारखे प्रकल्प सात ते आठ हजार कोटींचे आहेत. अशी तोकडी तरतूद असली तर प्रकल्प वर्षभरात, दोन, चार वर्षात कसे पूर्ण होतील हा प्रश्न आहे. -हर्षल चौधरी, शेतकरीमहागाई वाढतीलशासनाने इंधनाच्या करात वाढ केलेली असल्याने पुढील काळात इंधन स्वस्त झाले तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ महिला, गृहीणींना होणार नाही. भाज्या, कांदे यांचे दर कमी ठेवण्यासाठी सरकारला पुन्हा एकदा हस्तक्षेप करावा लागेल. असे दिसते. याशिवाय सर्वसामान्यांचा इंधनावरील खर्चही आहे तसाच रहील, असे वाटते. -अर्चना महाजन, गृहीणीशिक्षणाला प्रोत्साहनअर्थसंकल्पात चैनीच्या वस्तू महाग करुन ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केले आहे. करातील स्लॅबमध्येही फारसे बदल नाहीत. एका अर्थाने विद्यार्थ्यांच्या पालकांना याचा लाभ होईल. अपंग विद्यार्थ्यांचाही विचार झाला आहे. डिजीटल शिक्षणावरही लक्ष केंद्रीत केल्याने फायदा होईल. प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, मु.जे.महाविद्यालयउच्चशिक्षण परवडणारेसरकारने केलेल्या तरतुदीमुळे उच्चशिक्षण थोडे स्वस्त होऊ शकेल. सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना जाहीर झाली आहे. सेवा करात मात्र ०.५ टक्के वाढ केलेली असल्याने त्याचा काहीसा परिणाम या क्षेत्रावरही होऊशकतो.-प्राचार्यडॉ.एल.पी.देशमुख,नूतनमराठामहाविद्यालयअनेक गोष्टी योग्यचैनीच्या वस्तू महागणार असल्याचे अर्थसंकल्पातून सांगितले गेले आहे. हा निर्णय योग्य आहे. तसेच ५० लाखांचे खर खरेदीसाठी सवलत मिळणार आहे. ही सवलत नेमकी कशी मिळेल हे स्पष्टपणे पुढे यायला हवे. त्याचा लाभ सर्वसामान्यांना व्हावा.-नीलिमा जोशी, गृहीणी