नववर्षाचे जल्लोषात स्वागत
By admin | Published: January 1, 2016 06:35 AM2016-01-01T06:35:28+5:302016-01-01T06:57:23+5:30
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अवघी तरुणाई सरसावल्याचे चित्र दिसून आले. सायंकाळपासून सुरू झालेला नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अवघी तरुणाई सरसावल्याचे चित्र दिसून आले. सायंकाळपासून सुरू झालेला नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष रात्री उशिरापर्यंत सुरू होता. रात्री १२ वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात आल्याने आसमंत उजळून गेला.
मुंबईत सीएसटी, नरीमन पाईंन्ट, सी फेस या ठिकाणी घोळक्या घोळक्याने तरुण-तरुणी कल्ला करीत, एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत गळाभेट घेत होते. हृदयाचे आकार असलेले रंगीबेरंगी फुगे, फुले, तसेच शोभेच्या वस्तूंनी रस्ते फुललेले होते. आकर्षक टोप्या, रंगीबेरंगी गॉगल्स घालून सेल्फीही काढून घेत होते. हॉटेल्समध्येही तरुणांनी गर्दी केली होती. तरुणांप्रमाणोच तरुणीही ग्रुप-ग्रुपने फिरत जल्लोष करीत होत्या. रस्त्यावरील विविध खाद्यपदार्थाचा स्वाद घेत तरुणाईने जल्लोष केला. शहरात सर्वत्र नववर्षाच्या स्वागताची धूम सुरू असताना शहर आणि सोसायटय़ांमध्येही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, दिल्ली, गोवा, पुणे या ठिकाणांसह देशात सर्वत्र नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले.
न्युझीलंड, दुबई, ऑस्ट्रेलिया या ठिकाणीही मोठ्या उत्साहाच फटाक्यांची आतषबाजी करत नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आलेे. मात्र, दुबईतील जगातील सर्वात उंच बुर्ज खलिफा इमारतीजवळील एका हॉटेलला नवीन वर्षाचे स्वागत करताना गुरुवारी रात्री आग भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत हॉटेलचे मोठे नुकसान झाले असून १४ जण किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.