जामनेरात धनगर आरक्षण रथ यात्रेचे स्वागत
By admin | Published: May 17, 2016 01:03 AM2016-05-17T01:03:49+5:302016-05-17T01:03:49+5:30
जामनेर- महाराष्ट्र राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने संपूर्ण राज्यात रथ यात्रा काढण्यात येत असून हा रथ गुरुवारी सकाळी ११ वाजता न.पा.चौकात आला. त्यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.
Next
ज मनेर- महाराष्ट्र राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने संपूर्ण राज्यात रथ यात्रा काढण्यात येत असून हा रथ गुरुवारी सकाळी ११ वाजता न.पा.चौकात आला. त्यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत जोरवाड (ता.कौटीमहाकाळ) येथून ही रथ यात्रा सुरू झाली आहे. या रथयात्रेचा समारोप ३१ मे रोजी अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म गावी चौंडी ता.जामखेड येथे जयंती दिनी होणार आहे. तब्बल ४८ दिवसात ही रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ात जाणार आहे. न.पा.चौकात अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष सौ.साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेवक छगन झाल्टे, गटनेते महद्र बाविस्कर, जितू नेमाडे, समाधान सुशिर, दीपक कचरे, सुनील नेमाडे, तालुका अध्यक्ष डी.डी.पाटील, गणेश् मंडलिक, रवी देशमुख, बारकू जाणे, व्ही.डी.पाटील, मनोहर हडप, पारखे साहेब आदी यावेळी उपस्थित होते.कॅप्शन- रथाचे स्वागत करताना नगराध्यक्ष साधना महाजन व आदी मान्यवर.शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुखपदी ॲड.शरद माळीफोटो- तालुका प्रमुख, शहर प्रमुखधरणगाव- शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या तालुका प्रमुखपदी ॲड.शरद रामदास माळी यांची तर शहर प्रमुखपदी शैलेंद्रसिंग गुलाबसिंग चंदेल यांची नियुक्ती कक्षाचे राज्यचिटणीस ॲड.अरुण जगताप यांनी केली आहे शिवसेना भवन मुंबई येथे त्यांच्या समवेत जिल्हाप्रमुख गजानन मालपुरे हे उपस्थित होते.ॲड.माळी व चंदेल यांच्या नियुक्तीबद्दल उपनेते आ.गुलाबराव पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, उपजिल्हाप्रमुख सलीम पटेल, कक्ष जिल्हा संपर्क प्रमुख समाधान पाटील, शहर प्रमुख राजेेंद्र महाजन, युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख उमेश चौधरी व शिवसैनिकांनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.जामनेर तालुक्यातून शेंदुर्णीतील विद्यार्थी नवोदयासाठी सर्वाधिकशेंदुर्णी : यशाची परंपरा कायमशेंदुर्णी (जामनेर)- जानेवारी २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या निवड चाचणी परीक्षेत शेंदुर्णी येथील सरस्वती विद्यालयाचे पाच विद्यार्थी तर आचार्य गजाननराव गरुड माध्यमिक विद्यालयाचे २ विद्यार्थी असे एकूण ७ विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड करण्यात आले. जामनेर तालुक्यातून १२ विद्यार्थ्यांची संध्या आहे.गौरव किरण चौधरी, माधव रजनीकांत शुक्ला, प्रज्वल मनोज चौधरी, श्रेयस वासुदेव गुजर, सोहील गनी तडवी आदी विद्यार्थी हे सरस्वती मादध्यमिक विद्यालयाचे आहे. यांना मार्गदर्शन निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी आर.एस.जैन यांनी केले. संस्थेच्या चेअरमन श्रीमती डॉ.कौमुदिनी साने, मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, अजय सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.आचार्य गजाननराव गरुड माध्यमिक विद्यालयातून प्रियदर्शनी महेश भदाणे व यशवंत प्रमोद रावल्रसर या दोन विद्यार्थ्यांची नवोदयासाठी निवड झाली. त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, जि.प.सदस्य संजय गरुड, सहसचिव पी.एस.पाटील, दीपक गरुड, सागरमल जैन, प्राचार्य बी.जी.मांडवडे यांनी अभिनंदन केले. (वार्ताहर)