PM मोदींचं काशीत जल्लोषात स्वागत, पुष्पवृष्टी अन् 'हर हर महादेव'चा जयघोष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 01:04 PM2021-12-13T13:04:33+5:302021-12-13T13:05:54+5:30

वाराणसीच्या गल्ली-बोळातून मोदी कालभैरव मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. यावेळी, लोकांनी जल्लोषात मोदींचे स्वागत केले, मोदींच्या नावाचा जयघोष करत त्यांच्या गाडीवर पुष्पवृष्टीही करण्यात आली.

Welcome to Varanasi PM Narendra Modi in Jallosha, flower shower and chanting of Har Har Mahadev | PM मोदींचं काशीत जल्लोषात स्वागत, पुष्पवृष्टी अन् 'हर हर महादेव'चा जयघोष

PM मोदींचं काशीत जल्लोषात स्वागत, पुष्पवृष्टी अन् 'हर हर महादेव'चा जयघोष

Next

वाराणसी - पंतप्रधाननरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर असून काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे (Kashi Vishwanath Corridor) उद्घाटन केल्यानंतर त्यांची रिव्हर क्रूझवर काही मुख्यमंत्र्यांसोबत अनौपचारिक बैठक होणार आहे. तत्पूर्वी काशीतील कालभैरव मंदिरात जाऊन मोदींनी दर्शन घेऊन आरती केली. त्यानंतर, गंगा मार्गकडे प्रस्थान करुन ललिता घाट येथे गंगा नदीत मोदींनी डुबकी घेतली. 

वाराणसीच्या गल्ली-बोळातून मोदी कालभैरव मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. यावेळी, लोकांनी जल्लोषात मोदींचे स्वागत केले, मोदींच्या नावाचा जयघोष करत त्यांच्या गाडीवर पुष्पवृष्टीही करण्यात आली. मोदी मोदी आणि हर हर महादेव या घोषणांनी वाराणसीच्या गल्ली बोळात आसमंत दणाणून गेल्याचं पाहायला मिळालं. मोदींच्या गाडीवर करण्यात आलेल्या पुष्पवृष्टीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 


वाराणसीतील मोठ्या कॉरिडॉरची पायाभरणी मोदींनी 8 मार्च 2019 रोजी केली होती, जी मुख्य मंदिराला ललिता घाटाशी जोडते आणि चारही दिशांना भव्य दरवाजे आणि सजावटीचे तोरण दरवाजे बांधले आहेत. "पंतप्रधान मोदी घाटातून काशी विश्वनाथ धामला पोहोचतील आणि त्यानंतर कॉरिडॉरचे उद्घाटन करतील. ते नवीन कॉरिडॉरच्या परिसराची आणि इमारतींची पाहणी करतील. तसेच, देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने साधूंच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. यासाठी बरेच साधू आले आहेत."

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

दरम्यान, आज "संध्याकाळी नदीच्या समुद्रपर्यटनावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधानांची अनौपचारिक बैठक होईल. वाराणसीचे खासदार असल्याने त्यांनी नदीच्या काठावर वसलेल्या काशीची भव्यता मुख्यमंत्र्यांना दाखवण्याची इच्छा व्यक्त केली होती. रिव्हर क्रूझवरून पंतप्रधान गंगा आरती पाहतील आणि घाटांवर भव्य उत्सवाचा आनंद लुटतील. फटाक्यांची आतषबाजी आणि लेझर शोही होणार आहे.

Web Title: Welcome to Varanasi PM Narendra Modi in Jallosha, flower shower and chanting of Har Har Mahadev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.