ेसंथारा बंदीवरील स्थगितीचे स्वागत

By admin | Published: August 31, 2015 09:43 PM2015-08-31T21:43:59+5:302015-08-31T21:43:59+5:30

जैन समाजात उत्साह : पुढील लढ्याची तयारी

Welcoming the ban on the Sanstha ban | ेसंथारा बंदीवरील स्थगितीचे स्वागत

ेसंथारा बंदीवरील स्थगितीचे स्वागत

Next
न समाजात उत्साह : पुढील लढ्याची तयारी

नागपूर : जैन धर्मातील पवित्र संलेखना किंवा संथारा प्रथेवर बंदी आणणाऱ्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणल्याचे जैन समाजातून स्वागत करण्यात आले आहे. संथाराला आत्महत्या ठरविणाऱ्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा देशभरातील जैन समाजाने विरोध केला होता. यासंदर्भात देशव्यापी आंदोलनदेखील करण्यात आले. जैन समाजातील प्रतिनिधींनी या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी यावर सुनावणी करताना या निर्णयाला स्थगिती दिली. ही माहिती मिळताच जैन समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यासंदर्भात समाजातील मान्यवरांनी प्रतिक्रिया देत या निर्णयाचे स्वागत केले आहे.

संथारामुळे सत्व जागृत होते
संथारा ही जैन धर्मातील प्राचीन परंपरा आहे. आत्मशोध, आत्मसमाधी, तपसाधना या गोष्टी संथारामध्ये हळूहळू होतात. तसेच सत्व जागृत होते. यानंतरच संथाराची साधना होते. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे जैन समाजाचा विजय झाला आहे. भारतभर जैन समाज विविध संप्रदायांमध्ये असला तरी त्यांची एकता आंदोलनामध्ये दिसून आली. जैन धर्मात आत्महत्येचे अस्तित्व स्वप्नातदेखील नाही असे मत जैन संत आचार्यश्री पूर्णचंद्र सुरीश्वरजी महाराज यांनी व्यक्त केले.

संथारा अध्यात्म व भावनेचा विषय
संथाराच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देऊन योग्य केले आहे. या निर्णयाचे स्वागतच आहे. या निर्णयामुळे अल्पसंख्यक जैन समाजात आनंदाचे वातावरण आहे. संथारा जैन धर्माची भावना, अध्यात्म आणि स्वाभिमानाचा मुद्दा आहे असे प्रतिपादन मुनिश्री गिरनारसागरजी महाराज यांनी केले.

Web Title: Welcoming the ban on the Sanstha ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.