वेल्हे तहसील कार्यालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
By admin | Published: October 25, 2015 10:42 PM2015-10-25T22:42:01+5:302015-10-25T22:42:01+5:30
वर्षभरापासून प्रशासनास मुहूर्त मिळेना : श्रेय घेण्यावरून राजकीय पक्षांत चढाओढ
Next
व ्षभरापासून प्रशासनास मुहूर्त मिळेना : श्रेय घेण्यावरून राजकीय पक्षांत चढाओढ मार्गासनी : वेल्हे येथील तहसील कार्यालयाची इमारत उद्घाटन नसल्यामुळे गेल्या वर्षभरापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या धुळीचे साम्राज्य त्या ठिकाणी पसरले आहे. येथील तालुका प्रशासनास गेल्या वर्षभरापासून उद्घाटनासाठी मुहूर्त मिळत नाही. तालुक्यातील राजकीय पक्षांमध्ये इमारतीच्या उद्घाटनाचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ लागली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी, की वेल्हे तहसील कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त असे केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तहसील कार्यालयाचे काम पूर्ण होऊन दोन वर्षे झाली आहेत. इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाने महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. मागील वर्षी जुलै २०१४ व डिसेंबर २०१४ तहसील कार्यालयाचे उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले होते. पण कार्यक्रम पत्रिकेमध्ये पालकमंत्री गिरीश बापट यांचे नाव नसल्यामुळे उद्घाटन करण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. त्यांनतर सर्वच राजकीय पक्ष तहसील कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी सरसावले आहे. आपआपल्या पक्षातील बड्या नेत्यांना कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आणण्याच्या प्रयत्नात आहेत. पंचायत समितीवर काँग्रेसची सत्ता असल्याने काँग्रेस पक्षाकडून उद्घाटन झाले पाहिजे असे तालुक्यातील सत्ताधार्यांना वाटते. तर तालुक्यातील विकासकामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना वेळ नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. त्यावरून वेल्हे तहसील कार्यालयाचे उद्घाटन कोणत्या पक्षाने करायचे, यावरून चढाओढ लागली आहे. वेल्हे तहसीलच्या जुन्या इमारतीमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. इमारत पूर्णपणे गळत असून, कार्यालयातील महत्त्वाच्या फाईल व दस्ताऐवज खराब होत आहेत. उंदरांचा व सापांचा वावर कार्यालयात दिसून येत आहे. कर्मचारी बसण्याच्या ठिकाणी लाकडी तुळ्या तुटल्या आहेत तर कार्यालयाचे छप्पर कर्मचार्यांच्या अंगावर पडण्याची शक्यता आहे त्यामुळे कर्मचार्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. कोट...लवकरच तहसील कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. - मोसमी बर्डे, प्रांताधिकारी भोर इमारत पूर्ण होऊन जवळपास दोन वर्षे होत आली आहेत. इमारत हस्तांतरण केल्याचे पत्र महसूल विभागाकडे देण्यात आले आहे. - ठाणगे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वेल्हे फोटोसाठी ओळ धूळ खात पडलेली तहसील कार्यालयाची नवी इमारत.