आत्महत्या करायला गेला, मुर्खपणामुळे जीव वाचला
By admin | Published: April 25, 2017 06:01 PM2017-04-25T18:01:41+5:302017-04-25T18:01:41+5:30
मुर्खपणामुळे एखाद्याचा जीव गेल्याचं तुम्ही ऐकलं असेल, पण मुर्खपणामुळे कुणाचा जीव वाचल्याचं तुम्ही ऐकलंय का? पण मुर्खपणामुळे
Next
ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 25 - मुर्खपणामुळे एखाद्याचा जीव गेल्याचं तुम्ही ऐकलं असेल, पण मुर्खपणामुळे कुणाचा जीव वाचल्याचं तुम्ही ऐकलंय का? पण मुर्खपणामुळे आत्महत्या करण्यास निघालेल्या एका तरुणाचा जीव वाचल्याची घटना जयपूरमध्ये घडली आहे. येथील एक तरुण आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर झोपला. त्यादरम्यान एक ट्रेनही त्या ट्रॅकवरून धडधडत निघून गेली. मात्र या तरुणाला किरकोळ जखमांव्यतिरिक्त काहीही झाले नाही. तो जिवंत असल्याचे पाहून तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
याबाबत सविस्त हकीकत अशी, अजमेर-किशनगंज एक्सप्रेसचा ड्रायव्हर दौसा स्टेशमनवरून ट्रेन नेत होता. सुमारे 5 किमी अंतर पार केल्यावर त्याला ट्रॅकवर एक व्यक्ती उभी असल्याचे दिसले. त्याला वाचवण्यासाठी ड्रायव्हरने वारंवार हॉर्न वाजवला, पण ट्रॅकवर उभ्या असलेल्या तरुणाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर ड्रायव्हरने ब्रेक लावून ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ट्रेन त्याच्यावरून निघून गेली. या गोंधळात तो तरुण ट्रॅकच्या मध्येच झोपला. त्यामुळे त्याच्या जिवावर बेतले नाही.
या घटनेनंतर संबंधित तरुणार रेल्वे कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. नंतर त्याला जीआरपीच्या जवानांनी उपचारांसाठी रुग्णालयात नेले. दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव कमलेश बैरवा असून, तो दौसापासून जवळ असलेल्या एका गावातील रहिवासी असल्याची माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. मात्र आपण आत्महत्या करण्यासाठी ट्रॅकवर गेल्याचा दावा त्या तरुणाने फेटाळून लावला आहे. आपण रेल्वे रुळ ओलांडत असताना ही दुर्घटना घडल्याचे त्याने सांगितले.