करायला गेले प्रचार, तिथे नेताजींना आवडली महिला मतदार; निवडणुकीत हरले पण प्रेमात जिंकले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 03:13 PM2022-03-29T15:13:15+5:302022-03-29T15:13:37+5:30

Love Marriage News: बिहारमधील लोकप्रतिनिधींच्या प्रेमकहाण्या सध्या चर्चेत आहेत. सीतामढीमध्ये एक महिला सरपंच फरार झाल्याची घटना ताजी असतानाच नालंदामधील एका नेत्याची प्रेमकहाणी समोर आली आहे.

Went to campaign, there Netaji liked female voters; Lost in election but won in love | करायला गेले प्रचार, तिथे नेताजींना आवडली महिला मतदार; निवडणुकीत हरले पण प्रेमात जिंकले

करायला गेले प्रचार, तिथे नेताजींना आवडली महिला मतदार; निवडणुकीत हरले पण प्रेमात जिंकले

Next

पाटणा - बिहारमधील लोकप्रतिनिधींच्या प्रेमकहाण्या सध्या चर्चेत आहेत. सीतामढीमध्ये एक महिला सरपंच फरार झाल्याची घटना ताजी असतानाच नालंदामधील एका नेत्याची प्रेमकहाणी समोर आली आहे. या नेताजींना प्रचारादरम्यान पाहिलेली एक महिला मतदार एवढी आवडली की, त्यांनी निवडणुकीनंतर तिला थेट पत्नीच बनवले. या नेत्याला निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला, मात्र प्रेमाच्या निवडणुकीत ते विजयी झाले. 
ही घटना बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील आहे. येथे सरपंचपदाचे उमेदवार प्रचारादरम्यान प्रेमात पडल्यानंतर एका तरुणीशी विवाहबद्ध झाले.

उल्लेखनीय बाब म्हणजे लग्नाचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नालंदा जिल्ह्यातील करायपरसुराय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली आहे. प्रचारादरम्यान सदर नेताजी एका तरुणीच्या प्रेमात पडले. मात्र ते निवडणूक जिंकू शकले नाहीत. तरीही ते मुलीचं प्रेम मिळवण्यात यश मिळवले.

पंचायत निवडणुकीमध्ये रविकांत रविदास हे सरपंचपदाची निवडणूक लढत होते. प्रचारादम्यान, त्यांनी गावातील एका तरुणीला पाहिले. ते तिच्या प्रेमात पडले. बोलणं होऊ लागलं. भेटीगाठी होऊ लागल्या. याची कुणकुण या तरुणीच्या कुटुंबीयांना लागली. त्यांनी तिच्यावर निर्बंध आणले. मात्र संधी साधून हे दोघेही एकमेकांशी बोलत असत.

दरम्यान, निर्बंध वाढल्यावर दोघांनीही संधी साधून घरातून पळ काढला. याची माहिती जेव्हा या तरुणीच्या कुटुंबीयांना मिळाली. तेव्हा त्यांनी शोधाशोध करून दोघांनाही पकडले. त्यानंतर तरुणीला घरी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने नकार दिला. त्यानंतर गावातीलच एका मंदिरात त्यांचं लग्न लावून देण्यात आलं. आता या लग्नाची चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे.  

Web Title: Went to campaign, there Netaji liked female voters; Lost in election but won in love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.