‘व्हीआयपीं’ची खातीही ‘हॅक’ केली गेली का?; सरकारने ट्विटरकडे मागितला सविस्तर खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 10:49 PM2020-07-18T22:49:46+5:302020-07-19T06:15:54+5:30
कंपनीला दिली नोटीस
नवी दिल्ली : कंपनीच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून व गोपनीय कोड मिळवून काही हॅकर्सनी राजकारण, समाजकारण व उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्ती व काही आघाडीच्या कंपन्यांची खाती हॅक करून व्यक्तिगत माहिती चोरली, असे टिष्ट्वटरने स्वत:हून जाहीर केल्यानंतर ‘यात कोणी भारतीय व्हीआयपी’सुद्धा आहेत का, अशी विचारणा भारत सरकारने या मायक्रोब्लॉगिंग कंपनीकडे केली आहे.
सूत्रांनुसार भारतात सायबर सुरक्षेच्या जपणुकीची जबाबदारी असलेल्या ‘सीईआरटी-इन’ या मुख्य सरकारी संस्थेने ट्विटर कंपनीस यासंदर्भात सविस्तर नोटीस जारी केली आहे.
ट्विटर वापरणाºया भारतातील किती जणांची खाती हॅक झाली आहेत? त्यांचा व्यक्तिगत डेटाही चोरण्यात आला आहे का? अशा बाधित खातेधारकांना कळविण्यात आले आहे का, तसेच हॅक केल्यानंतर या खात्यांचा ज्यांनी वापर केला त्यातही कोणी भारतीय आहेत का? ट्विटरच्या भक्कम सुरक्षा यंत्रणेतील नेमक्या कोणत्या त्रुटींचा फायदा घेत हे हॅकिंग केले गेले व याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काय पावले उचलली जात आहेत, अशा अनेक मुद्यांवर कंपनीकडून खुलासा मागविण्यात आला आहे.
शनिवारी अमेरिकेत प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार हॅकर्सनी एकूण १३० ट्विटर खात्यांना लक्ष्य केले. त्यापैकी ४५ खात्यांचे पासवर्ड त्यांनी रिसेट करून त्या खात्यांवरून स्वत: टष्ट्वीट केल्या. त्यांनी ज्या आठ खात्यांची व्यक्तिगत माहिती डाऊनलोड केली ती खाती शहानिशा केलेली नव्हती.
कंपनीच्या म्हणण्यानुसार काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून र्हकर्सनी हे उद्योग केले व त्याठी लागणारी तांत्रिक ‘टूल्स’ त्यांनी कर्मचाºयांकडून लबाडीने मिळविली. ज्यांची खाती हॅक झाली त्यांच्याशी आम्ही संपर्क साधून आहोत व या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात असल्याने सर्वच महिती आताच उघड करता येणार नाही, असेही कंपनीने म्हटले आहे.
सायबरतज्ज्ञांच्या मते हॅक केलेल्या ट्विटर खात्यांचा वापर करून ‘डिजिटल’ चलनावर डल्ला मारणे हा हॅकर्सचा मुख्य उद्देश होता व जाहीररीत्या उपलब्ध असलेली ब्लॉकचेन व्यवहाराच्या माहितीचे विश्लेषण करता या हॅकर्सनी एक लाख डॉलरची ‘क्रिप्टो करन्सी’ मिळविल्याचेही दिसते.
अनेक मान्यवर झाले लक्ष्य
टिष्ट्वटर कंपनीने हॅक केलेल्या खात्यांची मुख्यत्वे अमेरिकेतील खातेदारांची नावे उघड केली आहेत. त्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, राष्ट्राध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार ज्यो बायडेन, अब्जाधीश उद्योगपती बिल गेट््स, जेफ बेझोस व इलॉन मस्क, अब्जाधीश गुंतवणूकदार वॉरेन बफेट, टीव्हीवरील रिअॅलिटी शोची ‘स्टार’ किम कर्दाशिआन, रॅप गायक कान्ये वेस्ट यांच्याखेरीज उबर व अॅप्पल या कंपन्यांचाही समावेश आहे.