पश्चिम बंगालमध्ये दोन गटात हाणामारी, 20 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 10:21 AM2018-08-23T10:21:58+5:302018-08-23T10:22:41+5:30
पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्हातील समुद्रगडमध्ये दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत 20 जण जखमी झाले आहेत.
वर्धमान - पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्हातील समुद्रगडमध्ये दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत 20 जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धमान जिल्हातील समुद्रगड परिसरात राहणा-या एका युवकाने येथील महिलांचे फोटो मॉर्फ करुन सोशल मीडियात शेअर केले. यानंतर फोटो शेअर करणा-या त्या युवकाला लोकांनी पकडून बदडले आणि माफी मागायला लावली. या घटनेनंतर माफी मागणा-या युवकाने पुन्हा आपल्या काही लोकांसह मारहाण करणा-या लोकांवर हल्ला चढवला. यावेळी दोन्ही गटात मोठी हाणामारी झाली. यामध्ये 20 जण जखमी झाले आहेत. जखमींना येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
West Bengal: 20 people injured in a clash which broke out between two groups in Samudragarh town in Purba Bardhaman district yesterday after morphed images of members of a family were allegedly posted on social media. pic.twitter.com/dXHFqX6ilM
— ANI (@ANI) August 23, 2018
दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तसेच, याप्रकरणी 18 जणांना अटक केली आहे.