बंगाल भाजपत मोठी फूट? 74 पैकी फक्त 51 आमदारांनाच राजभवनात नेऊ शकले सुवेंदू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 07:28 PM2021-06-14T19:28:43+5:302021-06-14T19:30:34+5:30

बंगाल विधानसभेतील विरोधीपक्ष नेते सुवेंदू अधिकारी यांनी सोमवारी राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतली. यावेळी त्याच्या सोबत 74 पैकी केवळ 51 भाजप आमदारच राजभवनात जाऊ शकले.

West bengal 23 BJP MLA absent while suvendu adhikaris visit to raj bhawan | बंगाल भाजपत मोठी फूट? 74 पैकी फक्त 51 आमदारांनाच राजभवनात नेऊ शकले सुवेंदू

बंगाल भाजपत मोठी फूट? 74 पैकी फक्त 51 आमदारांनाच राजभवनात नेऊ शकले सुवेंदू

googlenewsNext

कोलकाता - पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठी फूट पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. बंगाल विधानसभेतील विरोधीपक्ष नेते सुवेंदू अधिकारी यांनी सोमवारी राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतली. यावेळी त्याच्या सोबत 74 पैकी केवळ 51 भाजप आमदारच राजभवनात जाऊ शकले. या संपूर्ण घटनेने पश्चिम बंगाल भाजपमध्ये बंडखोरीचे संकेत मिळत आहेत. (West bengal 23 BJP MLA absent while suvendu adhikaris visit to raj bhawan)

सुवेंदू अधिकारी, राज्यातील निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसाचारासंदर्भात राज्यपालांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकलेले एकूण 51 आमदारही होते. मात्र, विधानसभेत भाजपच्या एकूण आमदारांची संख्या 74 आहे. या आमदारांनी हिंसाचाराच्या घटनांसंदर्भात राज्यपालांना निवेदन दिले आहे.

इतर 23 आमदार का होते अनुपस्थित?
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यापालांच्या बेटीसाठी सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत केवळ 51 आमदारच होते. उर्वरित 23 आमदार अधिकारी यांच्यासोबत गेले नाही. यावरून आता राजकीय चर्चांना उधान आले आहे. विशेष म्हणजे, तृणमूल काँग्रेसमधून भाजपत आलेले अनेक नेते, पुन्हा टीएमसीत जात असतानाच असा प्रकार घडला आहे.

ममता बॅनर्जींचा पुन्हा खेला होबे; लवकरच भाजपला आणखी धक्के देणार

भाजप नेते टीएमसीच्या संपर्कात असल्याच्या बातम्या -
टीएमसी सोडून भाजपत गेलेले मुकूल रॉय नुकतेच पुन्हा ममता बॅनर्जींसोबत गेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे आणखी काही नेते टीएमसीच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आहेत. एकूण परिस्थिती पाहता, भाजपचे अनेक आमदार पुन्हा टीएमसीत जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची बंडखोरी होणार नाही, असे भाजपचे म्हणणे आहे. मात्र, सुवेंदूंसोबत न गेलेल्या नेत्यांसंदर्भात अद्याप भाजपने कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. 

ज्यांनी विश्वासघात केला त्यांना पक्षात स्थान नाही - ममता
मुकूल रॉय यांनी शुक्रवारी पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रेवेश केला. मुकूल रॉय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसच्या मुख्यालयात जाऊन पक्षाचे सदस्यत्व घेतले. यावेळी ममता म्हणाल्या, मुकूल आपल्याच घरातील सदस्य आहेत. ते आपल्या घरी परत आले. मी त्यांचे अभिनंदन करते. निवडणुकीदरम्यान मुकूल यांनी आपल्यासोबत विश्वासघात केला नाही. ज्या लोकांनी विश्वासघात केली, त्यांना आम्ही पक्षात घेणार नाही. याच वेळी मुकूल रॉय यांना महत्वाची भूमिका दिली जाईल, असेही ममता म्हणाल्या.


 

Web Title: West bengal 23 BJP MLA absent while suvendu adhikaris visit to raj bhawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.