बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत ममता? तब्बल 24 आमदार संपर्कात असल्याचा TMCचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 01:09 PM2021-09-07T13:09:14+5:302021-09-07T13:20:27+5:30

गेल्या चार आठवड्यांत सौमेन रॉय, विश्वजित दास आणि तन्मय घोष यांच्यासह भाजपचे चार आमदार टीएमसीमध्ये सामील झाले आहेत. विशेष म्हणजे, हे सर्वच मुकुल रॉय यांच्या जवळचे मानले जातात.

West bengal 24 bjp mlas are in west bengal are in touch to join tmc claims mukul roy | बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत ममता? तब्बल 24 आमदार संपर्कात असल्याचा TMCचा दावा

बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत ममता? तब्बल 24 आमदार संपर्कात असल्याचा TMCचा दावा

Next

कोलकाता - पश्चिम बंगालमधील भाजपचे आमदार सौमेन रॉय पुन्हा टीएमसीमध्ये परतल्यानंतर, आता तृणमूल नेते मुकुल रॉय यांनी, येणाऱ्या काळात अनेक भाजप आमदार टीएमसीमध्ये सामील होऊ शकतात, असा दावा केला आहे. रॉय म्हणाले, ममता बॅनर्जी यांच्यासोबत काम करू इच्छिणारे 24 आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. तसेच, टीएमसीमध्ये येऊ इच्छिणाऱ्या नेत्यांची मोठी रांग आहे. (West bengal 24 bjp mlas are in west bengal are in touch to join tmc claims mukul roy)

याचा वर्षी जूनमध्ये, मुकुल रॉय स्वतःच भाजप सोडून टीएमसीमध्ये परतले आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांनी टीएमसीमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व स्वीकारले.

भवानीपूरचा संग्रामही नंदीग्राम सारखाच होणार? इथेही ममतांना घाम फोडण्याच्या तयारीत भाजप 

गेल्या चार आठवड्यांत सौमेन रॉय, विश्वजित दास आणि तन्मय घोष यांच्यासह भाजपचे चार आमदार टीएमसीमध्ये सामील झाले आहेत. विशेष म्हणजे, हे सर्वच मुकुल रॉय यांच्या जवळचे मानले जातात आणि हे सर्व 2021 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, मुकुल रॉय यांच्यामुळेच भाजपमध्ये सामील झाले होते.

 गेल्या आठवड्यात पार्थ चॅटर्जी यांच्या उपस्थितीत सौमेन रॉय यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. यापूर्वी 30 ऑगस्ट रोजी बिष्णुपूरचे आमदार तन्मय घोष टीएमसीमध्ये परतले. दुसऱ्याच दिवशी, उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बागडा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार विश्वजित दासही टीएमसीमध्ये सामील झाले. सौमेन रॉय टीएमसीमध्ये सामील झाल्यामुळे, आता बंगाल विधानसभेत भाजपच्या आमदारांची संख्या 71 वर आली आहे.

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांतील निवडणुकांसाठी भाजपनं कंबर कसली; PM मोदींचे सर्व मंत्र्यांना खास निर्देश

पश्चिम बंगालमधील तीन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर -
केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील तीन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. यांपैकी एक भवानीपूरची जागा आहे. येथून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढवतील, कारण बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममध्ये भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला होता. यावेळीही भाजप ममतांच्या विरोधात मोठ्या चेहऱ्यांवर डाव लावण्याचा विचार करत आहे. असे असतानाच तृणमूल काँग्रेसही भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत दिसत आहे.

Web Title: West bengal 24 bjp mlas are in west bengal are in touch to join tmc claims mukul roy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.