चिंताजनक! 'या' राज्यात 24 तासांत 7 लहान मुलांचा मृत्यू; घटनेने खळबळ, डॉक्टर म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 10:50 AM2023-03-02T10:50:29+5:302023-03-02T10:59:46+5:30

रुग्णालय प्रशासनाने परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले आणि 600 बालरोगतज्ञांसह 121 रुग्णालयांमध्ये 5,000 बेड तयार ठेवल्या आहेत.

west bengal 7 children die due to respiratory infection | चिंताजनक! 'या' राज्यात 24 तासांत 7 लहान मुलांचा मृत्यू; घटनेने खळबळ, डॉक्टर म्हणतात...

चिंताजनक! 'या' राज्यात 24 तासांत 7 लहान मुलांचा मृत्यू; घटनेने खळबळ, डॉक्टर म्हणतात...

googlenewsNext

पश्चिम बंगालमध्ये श्वसनाच्या संसर्गामुळे सात लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या परिस्थितीबद्दल घाबरण्याची गरज नाही कारण या वातावरणात इन्फ्लूएंझासारखे आजार सामान्य असतात आणि ज्या मुलांनी आपला जीव गमावला आहे. त्यांना इतर आजारांनी देखील ग्रासले होते. गेल्या 24 तासांत कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात पाच आणि बांकुरा सम्मिलानी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दोन मुलांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घाबरण्यासारखे काही नाही. इन्फ्लूएंझासारखे आजार वर्षाच्या या हंगामात सामान्य आहेत. एडेनो व्हायरसची लक्षणे असलेल्या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. बालकांना इतर आजारांनी ग्रासले होते. मृत्यू एडेनोव्हायरसमुळे झाला आहे की नाही हे निश्चित होण्यास वेळ लागेल असे त्यांनी सांगितले.

रुग्णालय प्रशासनाने परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले आणि 600 बालरोगतज्ञांसह 121 रुग्णालयांमध्ये 5,000 बेड तयार ठेवल्या आहेत. राज्य सरकारने सांगितले की, गेल्या एका महिन्यात राज्यात तीव्र श्वसन संसर्गाची (एआरआय) 5,213 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

अधिकारी म्हणाले, “एआरआय ही विविध व्हायरसमुळे होणारी एक सामान्य घटना आहे. चालू वर्षात एआरआय संसर्गाची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे कारण एडेनोव्हायरसमुळे हंगामी वाढ मागील वर्षांमध्ये (2021 आणि 2022) कोविड-19 च्या वाढीपेक्षा जास्त झाली आहे," असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: west bengal 7 children die due to respiratory infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.