पश्चिम बंगालमध्ये बॉम्ब स्फोटात ३ संशयित ठार तर एकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 01:21 AM2019-10-29T01:21:47+5:302019-10-29T06:31:28+5:30
बीएसएफ जवान जेव्हा भारत-बांगला सीमेवरील तस्करी रोखण्यासाठी गेले होते.
मुर्शिदाबाद - पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात सोमवारी क्रूड बॉम्बच्या स्फोटात तीन संशयित तस्कर ठार झाले, अशी माहिती बीएसएफच्या सूत्रांनी दिली.
बीएसएफ जवान जेव्हा भारत-बांगला सीमेवरील तस्करी रोखण्यासाठी गेले होते. तेव्हा तस्करी करणारे जनावरांच्या मानेवर सॉकेट बॉम्ब बांधत असल्याचं आढळले. बांगलादेशात तस्करीसाठी कुख्यात असलेल्या फरझीपारा गावात सीमारेषा पार करण्यासाठी पशुपालकांची तयारी करीत असताना आणखी एक संशयित तस्कर जखमी झाला, असे बीएसएफच्या अधिकाऱ्याने सांगितले. जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
WB: 3 people dead, 1 injured in socket bomb explosion
— ANI Digital (@ani_digital) October 28, 2019
Read @ANI story | https://t.co/NXXI7LwFW8pic.twitter.com/3fXe4VYXsB
"हे गाव जनावरांच्या तस्करीसाठी कुख्यात आहे. आम्हाला संशय आहे की जे मरण पावले ते गुरे तस्कर होते. ते गोवंश सीमापार तस्करीसाठी तयार करीत होते. ते सहसा जनावरांच्या गळ्याभोवती सॉकेट बॉम्ब बांधतात जेणेकरून बीएसएफने त्यांना पकडले तर बॉम्बने आमच्या जवानांना ठार मारले जाईल असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.