ममता बॅनर्जीही मदतीस सरसावल्या, मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांना जाहीर केली मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 02:30 PM2023-06-03T14:30:46+5:302023-06-03T14:31:17+5:30

Odisha Train Accident : ओडिशा येथील रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पश्चिम बंगाल सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे.

West Bengal chirf minister mamata banerjee announces a compensation of Rs 5 lakhs each for the next of kin of those people from the state who died in the accident  | ममता बॅनर्जीही मदतीस सरसावल्या, मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांना जाहीर केली मदत

ममता बॅनर्जीही मदतीस सरसावल्या, मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांना जाहीर केली मदत

googlenewsNext

नवी दिल्ली : ओडिशाच्या बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनच्या रेल्वे दुर्घटनेने देशात हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या या अपघातातील मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात टक्कर झाली, त्यानंतर हावडा एक्सप्रेसनेही जोरदार धडक दिली. या ३ ट्रेनच्या अपघाताचे भयावह फोटो आता समोर येत आहेत. त्यामुळे मृतदेहांची काय अवस्था झाली असेल याचा अंदाजही लावणे कठीण आहे. मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. अशातच पश्चिम बंगालमधील मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. 

आधी, ३०, ५०, ७० पाहता पाहता मृतांचा आकडा आता २०७ वरून २८० वर पोहचला आहे. आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार ९०० लोक जखमी आहेत अशी माहिती ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी दिली. दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने अपघातात मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील लोकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. जखमींना प्रत्येकी १ लाख रुपये आणि राज्यातील पीडितांना प्रत्येकी ५०,००० रुपये देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली. 

राज्यात दुखवटा घोषित
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शुक्रवारी रेल्वे अपघाताबाबत मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार ३ जून रोजी राज्यात एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे ३ जून रोजी संपूर्ण राज्यात कोणताही सण साजरा केला जाणार नाही. ओडिशाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने ही माहिती दिली आहे.

एक हात मदतीचा! ओडिशात रक्तदानासाठी तरूणाई सरसावली; ३००० हून अधिक युनिट रक्त जमा

तरूणाईचा मदतीचा हात 
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी पोहोचल्यानंतर मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, ओडिशातील अनेक रुग्णालयांमध्ये रक्तदान करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने आले आहेत. अशा अपघातांमध्ये जास्त रक्तस्त्राव होऊन जखमींचा मृत्यू होतो. रुग्णालयांना रक्ताची तातडीची गरज आहे. आतापर्यंत २८० हून अधिक लोक मरण पावले आहेत परंतु हा आकडा आणखी पुढे जाऊ नये म्हणूनच लोकांनी आपल्या मित्रांसह रक्त देण्याचे ठरवले. 

Web Title: West Bengal chirf minister mamata banerjee announces a compensation of Rs 5 lakhs each for the next of kin of those people from the state who died in the accident 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.