...तर पश्चिम बंगालमध्ये कोरोना स्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता; CM ममतांचं PM मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 05:56 PM2021-08-05T17:56:35+5:302021-08-05T17:58:40+5:30

पश्चिम बंगालमध्ये बुधवारी कोरोनाचे 826 नवे रुग्ण आढळून आले असून 10 जणांचा मृत्यू झाला. तसेच राज्यात आतापर्यंत कोरोनाचे 15,30,850 रुग्ण आढळून आले आहेत. तर 18,180 जणांचा मृत्यू झाला आहे.

West bengal CM mamata banerjee letter to pm Narendra modi about Corona situation and vaccine supply | ...तर पश्चिम बंगालमध्ये कोरोना स्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता; CM ममतांचं PM मोदींना पत्र

...तर पश्चिम बंगालमध्ये कोरोना स्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता; CM ममतांचं PM मोदींना पत्र

Next

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पुन्हा एकदा कोरोना लसीसंदर्भात तक्रार केली आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्रही लिहिले आहे. पश्चिम बंगालमध्ये लसीचा पुरवठा वाढविला गेला नाही, तर कोरोना महामारी अधिक गंभीर होऊ शकते. एवढेच नाही, तर पश्‍चिम बंगालला कोरोना लसीच्या जवळपास 14 कोटी डोसची आवश्यकता आहे, असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. (West bengal CM mamata banerjee letter to pm Narendra modi about Corona situation and vaccine supply)

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींशी झालेल्या भेटीतही कोरोना लसीचा मुद्दा उपस्थित केला होता. बैठकीनंतर मुख्यमंत्री ममता यांनी ही माहिती दिली होती.

देश नवे विक्रम प्रस्थापित करत होता, तेव्हा काही लोक सेल्फ गोल करत होते; मोदींचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

पश्चिम बंगालमध्ये बुधवारी कोरोनाचे 826 नवे रुग्ण आढळून आले असून 10 जणांचा मृत्यू झाला. तसेच राज्यात आतापर्यंत कोरोनाचे 15,30,850 रुग्ण आढळून आले आहेत. तर 18,180 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत, आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ग्लोबल अॅडव्हायजरी बोर्डाची बैठक घेतली. यावेळी नोबेल विजेते अभिजित बॅनर्जीही उपस्थित होते. बैठकीनंतर मुख्यमंत्री ममता म्हणाल्या, या वर्षाच्या अखेरीस दुर्गा पूजेच्या सुट्ट्यांनंतर आम्ही एक दिवस आड शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहोत.

PM मोदी काही दिवसांतच 9 कोटी शेतकऱ्यांना वाटणार 19 हजार कोटी; जाणून घ्या योजना, कुणाला होणार फायदा

राज्या-राज्यांत भेदभाव करू नका -
गुजरात, यूपी आणि कर्नाटक या राज्यांना मुबलक प्रमाणात कोरोना लसी मिळाल्या आहेत. मी लोकांमध्ये भेदभाव करत नाही. बंगालला लोकसंख्येच्या घनतेनुसार कमी लसी मिळाल्या आहेत. मी केंद्र आणि पंतप्रधान मोदींना विनंती करते, की राज्या-राज्यांमध्ये भेदभाव करू नका, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

Web Title: West bengal CM mamata banerjee letter to pm Narendra modi about Corona situation and vaccine supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.