West Bengal Election: प्रचारावर 24 तासांची बंदी; कोलकात्यातील गांधी पुतळ्यासमोर ममतांचे धरणे आंदोलन, असे आहे कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 01:23 PM2021-04-13T13:23:50+5:302021-04-13T13:29:30+5:30
"पश्चिम बंगालमध्ये एकदा जो पक्ष सत्तेतून बाहेर जातो तो परत येत नाही, हा येथील इतिहास राहिला आहे. ममता एकदा पराभूत झाल्या, तर परत कधी येऊ शकणार नाही." (CM Mamata Banerjee)
कोलकाता - निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना 24 तासांसाठी निवडणूक प्रचार करण्यास बंदी घातली आहे. आयोगाच्या या निर्णयाविरोधात ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकात्यातील गांधी पुतळ्याजवळ त्यांनी धरणे दिले आहे. निवडणूक आयोगाने ममतांच्या हिंदू-मुस्लीम वक्तव्यावरून ही कारवाई केली आहे. (West Bengal CM Mamata banerjee sits on dharna at gandhi murti over EC imposed ban election campaign)
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान ममतांनी मुस्लीम मतांसंदर्भात भाष्य केले होते. 8 एप्रिलला हुगळी येथे ममता बॅनर्जी यांनी निवडणूक प्रचार सभेदरम्यान मुस्लीम मतांचे विभाजन होऊ नये अशा आशयाचे भाष्य केले होते. यावरूनच निवडणूक आयोगाने त्यांच्यावर प्रचारासाठी बंदी घातली होती. यामुळे ममतांना आता 12 एप्रिलच्या रात्री 8 वाजल्यापासून ते 13 एप्रिलच्या रात्री 8 वाजेपर्यंत, असे 24 तास निवडणूक प्रचार करता येणार नाही.
ममता बॅनर्जी यांच्या निवडणूक प्रचारावर बंदी घालण्यात आल्यानंतर टीएमसी खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी हा लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर आम्ही निवडणूक जिंकत आहोत, हे भाजपला माहीत आहे. यामुळेच ममतांवर निवडणूक आयोगाकडून कारवाई होत आहे, असेही डेरेक ओ ब्रायन म्हणाले.
Kolkata: West Bengal CM Mamata Banerjee sits on dharna at Gandhi Murti, as a mark of protest after the Election Commission of India (ECI) imposed a ban on her for 24 hours from campaigning in any manner from 8 pm of April 12 till 8 pm of April 13#WestBengalElectionspic.twitter.com/BQR0NIIgkT
— ANI (@ANI) April 13, 2021
भाजपच्या जागांचे शतक, नंदीग्रामच्या लोकांनी ममतांना आऊट केले -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. चार टप्प्यांच्या मतदानानंतर तृणमूलला त्यांचा पराभव होत असल्याचे कळले आहे. आतापर्यंत झालेल्या मतदानात जनतेने इतके चौकार-षटकार लगावले आहेत की, भाजपच्या जागांचे शतक झाले आहे. तर नंदीग्रामच्या लोकांनी ममतांना आऊट केले आहे, या शब्दांत मोदी यांनी ममतांवर टीका केली.
ममता एकदा पराभूत झाल्या, तर परत कधी येऊ शकणार नाही -
मां, माटी आणि मानुषचे आश्वासन देत ममता बॅनर्जी १० वर्षांअगोदर सत्तेत आल्या होत्या. मात्र, त्यांनी महिलांना त्रास देणे, मातीला लुटणे आणि मनुष्यांचा रक्तपात हा मार्ग निवडला. तोडा फोडा व राज्य करा हीच त्यांची भूमिका राहिली. निवडणुकीतील पराभव दिसत असल्याने त्यांचा क्रोध व अस्वस्थता वाढत आहे. भाचा अभिषेक बॅनर्जीला पक्षाची धुरा देण्याचा त्यांचा मानस धुळीला मिळाला आहे, असे मोदी म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये एकदा जो पक्ष सत्तेतून बाहेर जातो तो परत येत नाही, हा येथील इतिहास राहिला आहे. ममता एकदा पराभूत झाल्या, तर परत कधी येऊ शकणार नाही, असा दावा पंतप्रधानांनी केला.